Categories: करमाळा

करमाळा शहरातील नागरिकांसाठी हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” या योजनेअंतर्गत कानाड गल्ली येथे गोरगरीबांचा दवाखाना सुरू


करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व तळागाळातील नागरिकांना तात्काळ, मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी करमाळा नगरपालिका व आरोग्य विभाग अधिक वेगाने आणि तत्परतेने कार्य करेल, अशी ग्वाही नगरसेवक तथा कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक सचिन घोलप यांनी दिली.
कानड गल्ली येथे आज नागरी आरोग्य केंद्राचे उद्घाटन जेष्ठ माजी नगरसेवक रामचंद्र घोलप यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी करमाळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी “हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” या योजनेअंतर्गत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
कार्यक्रमात बोलताना सचिन घोलप यांनी सांगितले की, करमाळा शहरातील हा तिसरा दवाखाना असून या अभिनव योजनेमुळे गोरगरीब व आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या रुग्णांना मोफत आणि तात्काळ आरोग्य सेवा मिळणार आहे. या केंद्रामध्ये औषधे, शुगर व बीपी तपासणी, रक्त तपासणी, लघवी तपासणी तसेच इतर प्राथमिक आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शहरातील गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये एमबीबीएस किंवा बीएचएमएस पात्रतेचा एक डॉक्टर तसेच आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून रुग्णांची योग्य तपासणी व उपचार केले जाणार आहेत. या केंद्राच्या मंजुरीसाठी महिला भाजप प्रदेश उपाध्यक्षा व जिल्हा परिषद गटनेत्या रश्मी बागल तसेच भाजपचे युवा नेते दिग्विजय बागल यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची भावना यावेळी घोलप यांनी व्यक्त केली.
हे केंद्र दररोज सकाळी ८ ते १२ आणि संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार असून रविवारी व राष्ट्रीय सणांच्या दिवशी बंद राहील. नागरिकांनी या केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्यास नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड, विरोधी पक्षनेते प्रशांत ढाळे, मुख्याधिकारी सचिन तपसे, तालुका आरोग्य अधिकारी महेश्वर काटकर, नगरसेवक संजय सावंत, विक्रमसिंह परदेशी, पूजाताई इंदलकर, लताताई घोलप, निर्मला गायकवाड, स्वातीताई फंड, चैत्राली सावंत, दीपक चव्हाण, सुनीताताई ढाणे, ज्योत्स्नाताई लुनिया, संदीप कांबळे, जबीन मुलानी, रवी जाधव, सुवर्णा आलाट, युवराज चिवटे, अश्विनी अब्दुले, साजदा कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे शिवाजी खंडागळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बांधकाम समितीच्या सभापती लताताई घोलप यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago