Categories: करमाळा

करमाळा नगर परिषद हद्दीतील कामांचे भूमिपूजन लोकार्पण समारंभ माजी आमदार संजयमामा शिंदे यांचेच हस्ते व्हावा ही करमाळा शहरवासीयांची अपेक्षा – माजी नगरसेवक प्रवीण जाधव

करमाळा प्रतिनिधी
२०१९ते २४ या कालावधीत करमाळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असताना माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा शहराचा चेहरा – मोहरा बदलण्याच्या दृष्टीने नगर विकास विभागाकडून कोट्ट्यावधी रुपयांचा निधी दिलेला होता. त्यांच्या पंचवार्षिक कालावधीमध्ये कोरोना ,महाविकास आघाडी सरकार पडणे, त्यानंतर मंजूर कामांना दिलेली स्थगिती, महायुतीचे सरकार सत्तेवरती येणे आदी प्रकारामुळे कामे सुरू व्हायला, पूर्ण व्हायला खूप विलंब झाला, परंतु ही सर्व कामे आज प्रत्यक्षात दिसू लागली असून या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ हा संजयमामा शिंदे यांचेच हस्ते व्हावा ही करमाळा शहरातील सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे असे प्रतिपादन करमाळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रवीण आबा जाधव यांनी केले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की,२०२४ निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा मतदार संघात अंतर्भूत असलेल्या करमाळा व कुर्डूवाडी या २ नगरपरिषदेला १५ कोटी निधी मंजूर करून घेतला होता .शासन निर्णय क्रमांक- संकीर्ण २०२४/प्र.क्र.८७(३५/का.१४११, दि.१४/१०/२०२४ नुसार
करमाळा नगरपरिषद ता. करमाळा येथे दत्त मंदिर (विकास नगर) ते शासकीय विश्रामगृह (सात विहीर) रस्ता डांबरीकरण करणे -५० लक्ष,रंभापुरा गल्ली येथे अंतर्गत गटारी बांधणे- २५ लक्ष,
रंभापुरा गल्ली करिता बोअर घेणे व पाण्याची टाकी बांधणे- २५ लक्ष, रंभापुरा गल्ली भुईकोट किल्ला शेजारील बाग सुधारणा करणे -१० लक्ष,घोलप हॉस्पिटल ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाठीमागील बाजू पर्यंत रस्ता काँक्रीट करणे – ३५ लक्ष,
भवानी पेठ मारुती मंदिर बाजू ते डॉ. लावंड हॉस्पिटल जवळील पुलापर्यंत रस्ता कांक्रीट करणे – १० लक्ष,
करमाळा शहरातमध्ये सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविणे -३० लक्ष,गणेश नगर आनंद बाग मुस्लिम स्मशानभूमी (कब्रस्तान) येथे सुशोभिकरण करणे, पाणीपुरवठा सोय करणे- १० लक्ष, शिंपी समाजासाठी सभागृह बांधणे- २५ लक्ष,ईदगाह मैदानवर फरसी बांधणे व सुशोभिकरण करणे – १० लक्ष,गवंडी गल्ली येथे समाज मंदिर बांधणे – १० लक्ष,रमेश कांबळे घर ते घोडके घर गटार बांधकाम करणे- १० लक्ष,देविदास कांबळे घर ते नगरपरिषद नाला येथे गटार काम करणे -१० लक्ष,प्रशांत कांबळे घर ते अविनाश कांबळे घरापासून पुढे सुहास कांबळे घर येथे गटार काम करणे- १५ लक्ष,सिद्धार्थ भोसले घर ते दशरथ बाबुराव कांबळे घर गटार बांधणे – १५ लक्ष,
सिध्दार्थ भोसले घर ते मधुकर थोरात घर रस्ता काँक्रीट करने – १५ लक्ष,सिध्दार्थनगर येथील अंगणवाडी क्र.२ ते जीवन कांबळे घर गटार काम करणे – १० लक्ष,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला कोपरा ते बाळासाहेब कांबळे घर रस्ता काँक्रीट करणे – १० लक्ष,रहिष कांबळे घर ते नाला गटार काम करणे – १० लक्ष,शितोळे घर ते गणपती मंदिर रस्ता गटार करणे – १० लक्ष,वाचनालयासमोर सांस्कृतिक भवन बांधणे- १५ लक्ष,संताजीनगर प्लॉटिंगमधील नगरपालिका खुल्या जागेत बगीचा विकसित करणे – १० लक्ष,संताजीनगर मधील अंतर्गत रस्ते काँक्रीट करणे – २० लक्ष,
संत सेना महाराज सांस्कृतिक भवन बांधणे – २० लक्ष
,मंगळवार पेठ काझीबोळ ते बारामती सहकारी बैंक बोळ रस्ता काँक्रीट करणे गटार बांधणे, पेव्हिंग ब्लॉक बसविणे – १५ लक्ष,करमाळा शहरास पाणी पुरवठा करणेसाठी दोन इलेक्ट्रीक मोटर (पंप) बसविणे – १ कोटी ४० लक्ष,सटवाई मंदिर पुल ते जामखेड रोड पुल (गोरख पवार यांचे दुकानापर्यंत) नाला ट्रेचिंग करणे – ५० लक्ष,कै. नामदेवराव जगताप नगरपालिका उर्दू शाळा नवीन वर्गखोली बांधणे – ३५ लक्ष याप्रमाणे करमाळा नगरपरिषदेसाठी ७ कोटी निधी प्राप्त झाला होता.
करमाळा नगर परिषदेने सदर कामांचे टेंडर आता प्रसिद्ध केले असून या कामांचा भूमिपूजन समारंभ संजयमामा शिंदे यांच्या हस्ते होणे उचित आहे.तसेच यापूर्वी त्यांनी दिलेल्या निधी मधूनही अनेक कामे पूर्णत्वास गेलेली आहेत .त्यामध्ये प्रामुख्याने ईदगाह मैदान सुशोभीकरण ,आयसीआयसी बँक ते फंड गल्ली रस्ता सिमेंट काँक्रीट करणे ,राज्यमार्ग 68 ते अण्णासाहेब जगताप विद्यालय रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे इत्यादी कामांचा लोकार्पण समारंभही मा.आ. संजयमामा शिंदे यांचे हस्ते व्हावा ही जनसामान्यांची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

मा.आ.संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून अखेर केम – ढवळस रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्णत्वास… प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांची माहिती.

करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघातील केम आणि परिसरातील विविध विकास कामांसाठी माजी आमदार संजयमामा शिंदे…

2 mins ago

वाढदिवस विशेष लेख -सर्वसामान्यांतून घडलेले जननेतृत्व : पोथरे गावचे माजी सरपंच विष्णू रंदवे यांचा प्रेरणादायी प्रवास

एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन केवळ स्वतःपुरते न जगता संपूर्ण गावाच्या विकासासाठी आयुष्य समर्पित…

2 hours ago

करमाळ्यातील दीड कोटींच्या रस्ते कामात ‘मोठा’ डोलारा; जाडी आणि रुंदीमध्ये कपात केल्याचा खळबळजनक आरोप

​करमाळा (प्रतिनिधी): करमाळा शहराच्या जुन्या बायपासवरील 'ICICI बँक ते जुनी लाकडी मिल फंड गल्ली' या…

5 hours ago

करमाळा शहरातील नागरिकांसाठी हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” या योजनेअंतर्गत कानाड गल्ली येथे गोरगरीबांचा दवाखाना सुरू

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व तळागाळातील नागरिकांना तात्काळ, मोफत व दर्जेदार आरोग्य…

20 hours ago

रावगावात विद्यार्थ्यांना स्टील डब्यांचे वाटप लक्ष्मण बुधवंत यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद शाळेत उपक्रम

  करमाळा प्रतिनिधी : समाजोपयोगी कार्याची परंपरा जपत येथील जि. प. प्राथमिक शाळा, धनगरवस्ती येथे…

1 day ago

करमाळा तालुक्यातील घारगावात श्री काळभैरवनाथ यात्रेचा जल्लोष; तमाशा, कुस्ती आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील घारगाव येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाच्या वार्षिक यात्रोत्सवाचा भव्य सोहळा यंदाही…

3 days ago