Categories: करमाळा

मा.आ.संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून अखेर केम – ढवळस रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्णत्वास… प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांची माहिती.


करमाळा प्रतिनिधी
करमाळा मतदार संघातील केम आणि परिसरातील विविध विकास कामांसाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांचेकडून जवळपास १० कोटी पेक्षा अधिक निधी मंजूर झालेला होता. त्यातील बहुतांश कामे पूर्णत्वास आली असून त्यामधील केम ढवळस रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्णत्वास आल्यामुळे येथील शेतकरी आणि मतदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधानी आहेत. तसेच याच रस्त्यावरील भुयारी पुलाचे कामही संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून नुकतेच सुरू झाले असून या कामासाठी तब्बल ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यामुळे या भागातील दळणवळणाचा प्रमुख प्रश्न निकाली निघालेला आहे .
या भागातील दळणवळणाचे मूलभूत प्रश्न येथील स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नेतृत्व करणारे प्रतिनिधी हे प्रश्न सोडू शकले नव्हते ,परंतु हे प्रश्न माजी आमदार शिंदे यांनी सोडवल्यामुळे येथील मतदार त्यांचे कायमस्वरूपी ऋणी राहील असा आशावाद ही तळेकर यांनी व्यक्त केला.मा.आ. शिंदे यांच्याकडून केम मध्ये आतापर्यंत
केम – सातोली गुटाळ वस्ती रस्ता १० लाख ,बापू साहेब दर्गा वॉल कंपाऊंड ५ लाख, मुलाणी वाडा रस्ता सिमेंट काँक्रीट करणे ५ लाख, अण्णा भाऊ साठे नगर समाज मंदिर १५ लाख, राऊत – थोपटे वस्ती ते वडशिवणे तलाव रस्ता मुरुमीकरण करणे ३ लाख, गुटाळ वस्ती रस्ता मुरुमीकरण करणे ३ लाख ही कामे पूर्णत्वास गेलेली आहेत.
केम ग्रामपंचायत उपसरपंच सागर कुरडे, अच्युत काका पाटील, सचिन काळे, गणेश तळेकर, बाजीराव तळेकर, अक्षय अनभुले,केम ग्रामपंचायत सदस्य , गोरख पारखे, योगेश ओहोळ, सुलतान मुलाणी, दत्तात्रेय बिचितकर, योगेश ओहोळ,नीलेश तळेकर, कै.विष्णू तात्या अवघडे पंचायत समिती माजी सदस्य विष्णू दादा पारखे, गोरख तळेकर, बापू पारखे, सचिन रणशिंगारे, दादासाहेब पारखे, मल्हार अवघडे, हनुमंत अवघडे, भैरु अवघडे, विष्णू ओहोळ मधु अवघडे, बाळू अवघडे, अनंत थोपटे, समाधान गुटाळ यांनी या कामासाठी पाठपुरावा केलेला होता त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले असून ही कामे अखेर पूर्णत्वास येत आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

3 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

5 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago