Categories: करमाळा

उमरड ग्रामपंचायत निवडणूक गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली लढणार – आण्णा पडवळे*

करमाळा प्रतिनिधी :
करमाळा तालुक्यातील मौजे – उमरड येथील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, युवा नेते अण्णा पडवळे यांनी ठाम भूमिका जाहीर करत निवडणुकीत मोठी राजकीय चुरस निर्माण केली आहे. उमरड ग्रामपंचायत निवडणूक ही सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश भाऊ चिवटे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली ताकदीने आणि एकजुटीने व गावातील सर्व समविचारी सहकाऱ्यांना सोबत घेऊन लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अण्णा पडवळे म्हणाले की, “गणेश भाऊ चिवटे हे केवळ नेते नसून विकासाचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी तालुक्यातील वीट जिल्हा परिषद गटात राबवलेली विकासकामे ही त्यांच्या कार्यक्षमतेची साक्ष देतात. प्रत्येक गावात रस्ते, पाणीपुरवठा, सामाजिक सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी ठोस काम केले आहे.”
ते पुढे म्हणाले, “उमरड गावालाही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळवून देत विविध कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे गावातील जनतेचा विश्वास चिवटे यांच्या नेतृत्वावर अधिक दृढ झाला आहे. याच विश्वासाच्या बळावर आम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवणार आहोत.”
“ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाईल. गावाच्या प्रगतीसाठी, तरुणांच्या भविष्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही एकदिलाने मैदानात उतरणार आहोत,” असा निर्धारही पडवळे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या घोषणेमुळे उमरड ग्रामपंचायत निवडणुकीत चिवटे समर्थक पॅनल अधिक आक्रमक होत असल्याचे दिसत असून, येणाऱ्या निवडणुकीत राजकीय समीकरणे चांगलीच रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
यावेळी त्यांच्यासोबत गणेश शहाजी चौधरी, समाधान गायकवाड, अजिंक्य बदे, धनाजी चांगदेव बदे उपस्थित होते,

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

13 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

17 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

18 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago