Categories: करमाळा

आवाटी येथे येत्या 30 मार्च सोमवारी हजरत बु अलीशाह कलंदर रह पानीपत यांच्या स्मरणार्थ उर्स कलंदर कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा तालुक्यातील आवाटी येथील हजरत चांद पाशा वली बाबा यांच्या दर्गाह मध्ये येत्या 30 मार्च 2026 (उर्दू 10 तारीख शवाल 1447) हिजरी सोमवारी पानीपत येथील हजरत बु अलीशाह कलंदर रह. यांच्या स्मरणार्थ उर्स कलंदर कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती दर्गाह कमिटीचे अध्यक्ष हाजी कादर भाई तांबोळी तसेच बाबाचे खादिम गुलाम नबी कादरी तसेच इरफान कादरी यांनी बोलताना दिली

आवाटी येथील वली बाबा दर्गाह या ठिकाणी ऊर्स मुबारक निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यामध्ये बु अलीशाह कलंदर यांची गिलाफ चादर दर्शनासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत राहणार आहे याशिवाय संध्याकाळी ईशा नमाज नंतर महफिले समाचा कार्यक्रम होणार असल्याचे दर्गाह ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने दर्गाहवर विविध रंगाची रोषणाई करण्यात आली असून आलेल्या भक्त गणांना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले हजरत वली चांद पाशा दर्गाहवर आजही विविध धर्माचे भाविक मोठ्या संख्येने येत असतात दर्गाह वर आलेल्या भक्तगणांना महाप्रसाद लंगर खाना वाटपाचे कार्यक्रम ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे याशिवाय या दर्गाहावर वर्षभरातून तीन धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहमय वातावरणात साजरे केले जातात

सदर धार्मिक कार्यक्रमाचा लाभ भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन दर्गाह ट्रस्टच्या वतीने सुफी हसनैन कादरी (सज्जादा नशिन) तसेच आवाटी ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले आहे

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago