Categories: Uncategorized

माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी रेल्वे सुविधाबाबत केलेल्या पाठपुराव्याला अंशतः यश.. उर्वरीत गाडी थांब्यासाठी पाठपुरावा सुरू- ॲड. अजित विघ्ने उपसभापती पं. स.

  करमाळा  प्रतिनिधी- मध्य रेल्वेच्या केत्तुर रेल्वे स्टेशनवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळणेकामी सन-२०२५ पासुन पाठपुरावा चालु असुन, चैन्नई-मुंबई एक्स्प्रेसला थांबा मिळविणे करीता प्रयत्न चालु आहेत. याशिवाय प्रवाशांचे मागणीची दखल घेत वाशिंबे, जेऊर, केम, कुर्डुवाडी, केत्तुर येथिल स्टेशनच्या सुविधांबाबत देखिल पाठपुरावा केलेला आहे. मागिल केलेल्या पाठपुराव्याला काही प्रमाणात यश आले असुन गेट क्रमांक -२८ केत्तुर येथील व अन्य ठिकाणची कामे प्रगतीपथावर आहेत. केत्तुर( पारेवाडी) रेल्वे स्टेशन व परिसरातील गावांचा विचार करता या स्टेशनला पुणे- मुंबईकडे जाणाऱ्या येणाऱ्या एक्स्प्रेस गाडीला थांबा आवश्यक आहे. सन १९९७ पासुन येथील प्रवाशांची एक्स्प्रेस गाडी थांब्याची मागणी असुन या स्टेशनवर एक्सप्रेस गाडी थांबल्यास त्याचा फायदा या भागातील प्रवासी, व्यापारी, विद्यार्थी यांना होणार आहे. आज या भागातील प्रवाशांना बाय रोडने चाळीस चाळीस कि.मी प्रवास करून जेऊर येथे जावे लागते. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. रेल्वेचा प्रवास करून परत बाय रोडने प्रवास करावा लागतो. वस्तुतः केत्तुर रेल्वे स्टेशनला चैन्नई-मुंबई गाडी जरी थांबली तरी प्रवाशांची सोय होणार आहे. तसेच कलबुर्गी गाडीचा वाशिंबे येथे थांबा देणेची देखिल गरज असलेचे बाबत रेल्वे विभागाचे विभागिय रेल्वे व्यवस्थापकांना वेळोवेळी भेटून निवेदन केले आहे. याबाबत रेल्वे विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केलेचे बाबत कळविण्यात आले असुन.. याबाबतचा पाठपुरावा चालु असले बाबतची माहिती करमाळा पंचायत समितीचे नुतन उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांनी दिली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

9 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

1 day ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

1 day ago