Categories: Uncategorized

करमाळा शहरासाठी ४.२५ कोटींचा भरीव निधी मंजूर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने विकासकामांना वेग नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष सहकार्यामुळे करमाळा शहराच्या विकासासाठी एकूण ४ कोटी २५ लाख १६ हजार ७७० रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असल्याची माहिती नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मनःपूर्वक आभार मानत सांगितले की, शहराच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत कामे :
या योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी रु. ४५,६७,८२८ निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच संगम चौक ते महात्मा गांधी पुतळा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी रु. १,४९,३१,९८८ निधी मंजूर झाला आहे.
चांदगुडे गल्ली परिसरातील विविध रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी टप्प्याटप्प्याने निधी देण्यात आला असून, अभिमान चांदगुडे घर ते राऊत घर (भाग ब) – रु. ८,९०,३११, राऊत घर ते नेटके हॉस्पिटल (भाग अ) – रु. ७,३८,९८९, राऊत घर ते नेटके हॉस्पिटल (भाग ब) – रु. ५,७५,१००, मांगले घर ते पवार घर – रु. ९,९९,५६२, मांगले घर ते चांदगुडे घर – रु. ९,९९,५६२ तसेच चिंचकर घर–समाज मंदिर–माने घर–निकम घर मार्गासाठी रु. ९,९९,५६२ निधी मंजूर करण्यात आला आहे.
याचबरोबर चांदगुडे गल्ली परिसरातील गटार बांधकामासाठी रु. ३०,८९,८७० निधी देण्यात आला असून, प्रभाग क्रमांक १ मध्ये नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत १० आसनी सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी रु. २५,२७,११० मंजूर झाले आहेत.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत कामे :
प्रभाग क्रमांक १० मौलाली माळ भागात गटार बांधकाम (भाग अ) – रु. ४३,८३,०५९, गटार बांधकाम (भाग ब) – रु. २४,३५,५५१ तसेच स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय बांधकाम (भाग अ) – रु. २६,८९,१३९ आणि (भाग ब) – रु. २६,८९,१३९ निधी मंजूर झाला आहे.
अतिरिक्त निधी व योजना :
कृष्णाजी नगर येथे ‘नमो उद्यान’ उभारण्यासाठी रु. १ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान योजनेअंतर्गत शिक्षणासाठी रु. ५० लाख आणि आरोग्यासाठी रु. ५० लाख निधी मंजूर झाला आहे.
हा निधी मंजूर करून घेण्यासाठी नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत, उपनगराध्यक्ष अतुल भैय्या फंड, करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे, दिपक चव्हाण वसर्व नगरसेवक तसेच नगर परिषद कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले असल्याचे सावंत यांनी नमूद केले.
“करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून, भविष्यातही अधिकाधिक निधी आणून विकासकामांना गती देऊ,” असा विश्वास नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी व्यक्त केला.या पत्रकार परिषदेस सावंत गट व भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

8 hours ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

14 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago