Categories: करमाळा

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत मिळालेली नाही हजारो शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत राजाभाऊ कदम यांचा आंदोलनाचा इशारा

करमाळा प्रतिनिधी : करमाळा तालुक्यात २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली माती खरडून गेली जनावरे वाहून गेली तर उजनी काठच्या शेतकऱ्यांच्या जमिनींना पाणी लागल्यामुळे केळी पिकांचे व इतर फळबागांचे फार मोठे नुकसान झाले मंत्र्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांचे सांत्वन केले सरकारने मदतीची घोषणा केली पंचनाम्याचे आदेश दिले तहसीलदार यांनी तलाठी मंडळंधिकारी यांच्या माध्यमातून सर्व पंचनामे केले मात्र काही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे अध्याप ही हजारो शेतकरी मदती पासून वंचीत आहेत शेतकरी तहसील कचेरी कडे हेलपाटे मारतात शेतकऱ्यांचे समाधान होत नाही अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी आठ दिवसात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी व ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन देखील आर्थिक मदती पासून वंचित राहिले आहेत त्या शेतकऱ्यांची मदतीची रक्कम किती मंजूर आहे त्यांची नावे व नावा पुढे त्यांची रक्कम लिहून प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायत वरती यादी चिटकवावी तहसील कार्यालयामध्ये शेतकरी चौकशी साठी आल्यास सबंधित कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला उद्धटपणे बोलू नये शांतपणे समजून सांगावे अशा सर्व मागण्या बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष व आदिनाथ कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी शासनाकडे केल्या आहेत आठ दिवसात शेतकऱ्याचे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पैशे नाही मिळाल्यास शेतकऱ्यांना घेऊन बहुजन संघर्ष सेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा राजाभाऊ कदम यांनी दिला आहे या वेळेस त्यांच्या समवेत योगेश कोंडलकर , दादा करे,विलास बोराडे ,बदर, भाऊ सरडे आदी शेतकरी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

8 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

1 day ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

1 day ago