करमाळा प्रतिनिधी शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या 31 मार्च रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा आगळा वेगळा उपक्रम म्हणून वाढदिवसानिमित्त वायपट खर्च न करता कामगारांची गरज ओळखून गरजू बांधकाम कामगारांना गृहउपयोगी किट (भांडी) वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम हा अमोल जाधव यांच्या गायकवाड चौक येथील संपर्क कार्यालय येथे संपन्न झाला
या गृहपयोगी वस्तूमध्ये एकूण 30 वस्तू दिल्या आहेत. यामध्ये ताट -4, वाट्या -8, ग्लास-4, पातेले – 3, मोठा चमचा -2, जग -1, मसाला डबा -1, डबे -3, परात -1, प्रेशर कुकर -1, कढई – 1, टाकी – 1 या वस्तूंचा समावेश आहे.
बांधकाम कामगार हा सातत्याने स्थलांतरित करीत असतो. एका साईटवरील काम संपले की नवीन बांधकामाच्या ठिकाणी अगदी कुटुंबासह अनेक बांधकाम कामगार जात असतात. अशावेळी अनेक अडचणींचा या बांधकाम कामगारांना सामना करावा लागतो. अगदी निवासस्थानाची सोय, पाल्यांचे शिक्षण आणि आरोग्यविषयक समस्या यांची मोठी गैरसोय होत असते, पण यातूनही या बांधकाम कामगारांच्या संसाराला वेगळ्या पद्धतीने हातभार लागण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवला आहे असे यावेळी जाधव यांनी व्यक्त केले
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…