केत्तुर प्रतिनिधी राजाराम माने- सोलापुर,पुणे,अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायीनी असणारे उजनी धरण अखेर ३१ ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरले असून धरणात सोमवार (ता.३१) रोजी १०० टक्के पाणीसाठा झाल्याने परिसरातील शेतकरी आनंदित झाला असून तो सुखावला आहे
उजनी उजनी धरणाची पाणी क्षमता ११७ टीएमसी एवढी असून जलाशयात ११७ टक्क्यापर्यंत पाणी साठा केला जाऊ शकतो धरण पूर्ण क्षमतेने भरले आणि पिण्याच्या पाण्याचे पांडू क्षेत्रातील शेतकऱ्यांना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध झाला आहे धरणाच्या या पाण्याचा कर्जत (जि. नगर )इंदापूर, दौंड (जि. पुणे) तसेच करमाळा (जि. सोलापूर ) यासह बार्शी उस्मानाबाद लातूर येथील पाणीपुरवठा योजना उजनी वरूनच कार्यान्वित आहेत. तालुक्याचे इतर गावांना फायदा असतो तसेच त्यावरील शहरातील बहुतांश पाणीपुरवठा योजना या पाण्यावरच अवलंबून असतात.
उजनी केव्हा भरणार ? याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले होते आज सकाळी धरण शंभर टक्के भरले याची वृत्त समजताच शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
पुणे जिल्हा परिसर,घाटमाथा तसेच भीमा खोऱ्यात झालेल्या पावसाच्या बळावरच उजनी धरण शंभर टक्के भरले आहे.सध्या पुणे जिल्ह्यातील घोड,पानशेत,पवना,वीर,नाझरे,गुंजवणे,आंध्रा,कळमोडी आदी धरणेही भरल्याने त्यातील अतिरिक्त पाणी उजनी जलाशयात डिकसळ (ता.इंदापूर) येथून दाखल होत आहे.उजनी जलाशयात पाणी दाखल होत असल्याने पाण्याचा रंग मात्र गढूळ झाला आहे. ७ ऑगस्ट १९ रोजी धरण पाणी पातळी १०० टक्के झाली होती तर १७ जुलै २० रोजी धरणाचा पाणीसाठा वजा १.४ टक्के होता तो २० जुलै रोजी मायनस मधून प्लस मध्ये आला तर आज सकाळी अकराच्या दरम्यान (३१ ऑगस्ट रोजी ) धरणाचा पाणीसाठा १०० टक्के झाला आहे. सध्या उजनी जलाशयातून सीना माढा बोगदा, कॅनाल, नदीपात्रात तसेच इतर ठिकाणी विसर्ग सुरु करण्यात आला आहे. छायाचित्र: केतूर (ता.करमाळा ) : उजनी बॅकवॉटर परिसरात वाढत असलेली पाणी. छायाचित्र : अभय माने,
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…