करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आज शुक्रवार दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी मुळव्याध संबंधीच्या आजाराविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराचे आयोजन मुळव्याध आजारासंबंधी महाराष्ट्र राज्यामध्ये नामांकित असलेले डॉ श्री प्रदीप तुपेरे साहेब व त्यांचे समवेत असलेले नामांकित डॉक्टर व त्यांची टीम यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित शिबिराचे आयोजन केले होते सदर शिबिरामध्ये 87 रूग्णांनी सहभाग नोंदवला मुळव्याध संबंधीच्या आजाराविषयी विविध तपासण्या करून काही ऑपरेटिव्ह असणाऱ्या नागरिकांचे ऑपरेशन करण्यात आले या सर्व सुविधा नाममात्र दरामध्ये या शिबिरामध्ये देण्यात आल्या जाधव -पाटील हॉस्पिटलचे सर्वेसर्वा असणारे डॉ रोहन पाटील यांच्या आई कमला भवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले होते सदर शिबिरामध्ये 87 रुग्णांनी तपासणी करून घेतली त्यासाठी जाधव -पाटील हॉस्पिटल मधील त्यांचे डॉक्टर्स व संबंधित कर्मचारी यांनी सहकार्य करून नागरिकांना उत्तम अशी सेवा देण्यात आली जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये इथून पुढेही करमाळा तालुक्यातील नागरिकांसाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रोगासंबंधीच्या शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे नमूद केले शिबीर यशस्वी होण्यासाठी सचिव श्री अभिजित पाटील, डॉ शिवानी पाटील, श्री अजिंक्य पाटील, श्री तात्यासाहेब जाधव, श्री महादेव भोसले, श्री प्रमोद जगदाळे, त्याचबरोबर श्री राहूल जाधव ,श्री शितल पेटकर यांनी सहकार्य केले
त्याचबरोबर आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, आरोग्य विषय व शैक्षणिक सेवा देण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जाईल याचा लाभ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना होईल असे डॉ रोहन पाटील यांनी सांगितले
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा…
करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…