Categories: Uncategorized

कै.डॉ.प्रदीपकुमार (आबा) जाधव -पाटील यांच्या जयंतीनिमित्त आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये मुतखडा, किडनी विकार, प्रोस्टेटग्रंथी संबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आज रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी किडनी विकार, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी संबंधीच्या आजाराविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराचे आयोजन मुतखडा , किडनी विकार, प्रोस्टेटग्रंथी आजारासंबंधी महाराष्ट्र राज्यामध्ये नामांकित असलेले डॉ श्री आनंद काशिद साहेब व त्यांचे समवेत असलेले नामांकित डॉक्टर व त्यांची टीम यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित शिबिराचे आयोजन केले होते सदर शिबिरामध्ये 54 रूग्णांनी सहभाग नोंदवला मुतखडा, किडनी विकार, प्रोस्टेटग्रंथी संबंधीच्या आजाराविषयी विविध तपासण्या करून काही ऑपरेटिव्ह असणाऱ्या रूग्णांना योग्य उपचार करण्यात आले या सर्व सुविधा नाममात्र दरामध्ये या शिबिरामध्ये देण्यात आल्या जाधव -पाटील हॉस्पिटलचे सर्वेसर्वा असणारे डॉ रोहन पाटील यांच्या आई कमला भवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले होते सदर शिबिरामध्ये 54 रुग्णांनी तपासणी करून घेतली त्यासाठी जाधव -पाटील हॉस्पिटल मधील त्यांचे डॉक्टर्स व संबंधित कर्मचारी यांनी सहकार्य करून नागरिकांना उत्तम अशी सेवा देण्यात आली जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये इथून पुढेही करमाळा तालुक्यातील नागरिकांसाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रोगासंबंधीच्या शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे नमूद केले शिबीर यशस्वी होण्यासाठी सचिव श्री अभिजित पाटील, डॉ शिवानी पाटील, श्री अजिंक्य पाटील, श्री तात्यासाहेब जाधव, श्री महादेव भोसले, श्री प्रमोद जगदाळे, त्याचबरोबर श्री राहूल जाधव ,श्री शितल पेटकर यांनी सहकार्य केले

त्याचबरोबर आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, आरोग्य विषय व शैक्षणिक सेवा देण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जाईल याचा लाभ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना होईल असे डॉ रोहन पाटील यांनी सांगितले

saptahikpawanputra

Recent Posts

श्री कमलाभवानी मंदिरात २ हजार महिलांचा दुर्गा सप्तशती पाठ भक्तिमय वातावरणात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवा; विश्वकल्याणासाठी सामूहिक प्रार्थना

करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे…

10 hours ago

नेरलेची एसटी आठ दिवसांत सुरू करा; अन्यथा ठिय्या आंदोलन औदुंबर राजेभोसले यांचा एसटी महामंडळाला इशारा; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

करमाळा प्रतिनिधी करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावर सुरू असलेली एसटी बससेवा अचानक बंद झाल्याने नेरले परिसरातील नागरिक, विद्यार्थी…

12 hours ago

करमाळ्यात १२ वा आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत महोत्सव व पुरस्कार सोहळा

  करमाळा प्रतिनिधी : कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे…

13 hours ago

करमाळा पोलिसांचा धडाका; १० लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि मोटारसायकल चोरीचा छडा; दोन आरोपी अटकेत

करमाळा  प्रतिनिधी करमाळा शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या पर्समधून चोरीस गेलेल्या सुमारे १० लाख ५ हजार…

1 day ago

करमाळ्याच्या मुथा नॉलेज फाउंडेशनची आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत दमदार कामगिरी; 57 पैकी 48 विद्यार्थ्यांचा गौरव

  करमाळा प्रतिनिधी सात मिनिटांत 100 गणिते सोडविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; प्रथम ते सहाव्या…

2 days ago

श्रावणात ‘हर हर महादेव’चा जयघोष; करमाळ्याचे श्री खोलेश्वर महादेव मंदिर भक्तीने उजळले पुरातन वास्तू, रथोत्सव आणि शिवनाम सप्ताहाची परंपरा आजही कायम

करमाळा  प्रतिनिधी श्रावण महिना हा भगवान महादेवाच्या भक्तीचा आणि उपासनेचा महिना मानला जातो. या पवित्र…

4 days ago