करमाळा (प्रतिनिधी) –भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त करमाळा शहरात समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
हे शिबिर सोमवार, दिनांक 06 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत न. प. सांस्कृतिक सभागृह, खोलेश्वर मंदिर समोर, करमाळा येथे पार पडणार आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जात असून “आपले एक रक्तदान — कुणाचे तरी जीवनदान” या भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच आयुष्यमान भारत कार्ड हे गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरोग्य सुरक्षा कवच ठरत असल्याने या शिबिराचा लाभ घ्यावा, असेही सांगण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन दिपक अरुण चव्हाण (नगरसेवक, गटनेता भाजप, करमाळा नगर परिषद) यांच्या वतीने करण्यात आले असून, शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समाजहितासाठी आयोजित या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान व आयुष्यमान कार्ड नोंदणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…