डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६ रोजी होणाऱ्या महाअधिवेशनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या जय्यत तयारीची पाहणी संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी पणजी येथील कला अकादमी परिसरात जाऊन केली. यावेळी गोवा अधिवेशन कोअर कमिटीची बैठक कला अकादमीच्या कार्यालयात पार पडली यावेळी संघटनेचे गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, महाराष्ट्र महासचिव विकास भोसले, केंद्रीय उपाध्यक्ष महेश कुगावकर केंद्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील, केंद्रीय महासचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण, राज्य प्रसिद्धीप्रमुख धिरज शेळके, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तथा स्मरणिका संपादक भाऊसाहेब फास्के, यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना केंद्रीय अध्यक्ष राजा माने म्हणाले, गोवा येथे होणारे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन हे ऐतिहासिक अधिवेशन होणार असून गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची सर्व टीम अत्यंत नियोजनबद्ध काम करीत असून देशभरातील हजारो संपादक पत्रकार या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असून संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांनी या अधिवेशनासाठी अधिकृत नाव नोंदणी १५ एप्रिल २०२६ पर्यंत आपापल्या जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष यांचेकडे करावी.
यावेळी गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील म्हणाले, “गोवा राज्याला ऐतिहासिक व पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे गोवा येथे होणारे अधिवेशन अधिक दर्जेदार व सर्वांच्या ज्ञानात भर पडणारे असे होईल यासाठी आम्ही सर्व आपल्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत.”असे सांगितले आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…