Categories: Uncategorized

खासगी शाळेच्या संदर्भात चुकीची अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार – जिल्हा अध्यक्ष संभाजी घाडगे

सोलापूर प्रतिनिधी
शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व
शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही तरी शासनाने यांचा रहिवासी भत्ता बंद करावा व मागील सर्व भत्ता वसूल करावा कारण त्यानी शासनाची फसवणूक केली आहे. अन्यथा यांच्यावर गुन्हे दाखल करावे.
यांच्या शाळेची गुणवत्ता, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, NMS परीक्षा व दहावीचा निकाल, इ. गोष्टीवरून पगार द्यावे.
सर्व शिक्षकांनी उचललेले मेडिकल बिले यांची सखोल चौकशी करावी.अशीही मागणी नुतन जिल्हा अध्यक्ष संभाजी घाडगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
सोलापूर येथे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन म्हणज े मेष्टा (एफ) या संघटनेच्या सर्व सभासद संस्थाचालकांची मीटिंग संपन्न झाली. या मीटिंगसाठी जिल्ह्यातून 190 संस्थाचालक उपस्थित होते.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हरीष शिंदे व सचिव गणेश नीळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मीटिंग संपन्न झाली. या दोघांच्याही निवडी एकमताने पुन्हा करण्यात आल्या. यावेळी नवीन पदाधिकारी निवडी झाल्या. नूतन जिल्हाध्यक्षपदी बार्शीच संभाजी घाडगे यांची निवड करण्यात आली. संघटनेची भविष्यातील ध्येय धोरणे ठरवण्यात आली. यावेळी प्रत्येक शाळेच्या अडीअडचणीवर मात करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. यामध्ये संघटनेसाठी ऑफिस, दरवर्षी संघटनेच्या वतीने आदर्श शाळा, आदर्श संस्थाचालक, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात यावे. राज्य स्तरावरील काय अडचणी असतील त्या निवारण कराव्या, शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जावे.
सर्व व्यवहार पारदर्शक व्हावे, दरवर्षी मार्चमध्ये सर्व ऑडिट केले जावे असे ठरविण्यात आले. शिक्षक संच निश्चिती वेळी कोणत्याही शाळेने कसल्याही परिस्थितीत अनुदानित शाळांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करू नये असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. दर महिन्याला एका तालुक्यामध्ये मीटिंग घेण्याचे नियोजन करण्यात आले. संघटना वाढीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे ठरवले. जर संघटनेमध्ये सभासद असलेल्या कोणत्याही संस्थापकाला कसलीही अडचण आली तर सर्वांनी त्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभा राहण्याचे ठरविण्यात आले.
सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे संघटनेच्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. लवकरच पुन्हा एकदा मीटिंग घेऊन तालुकास्तरावरील तसेच इतर निवडी करण्यात येतील. येत्या दोन तीन दिवसांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना संघटनेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या अडचणी संदर्भात निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
………………
स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील संस्था चालकांच्या तसेच शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार. काही शिक्षक संघटना प्रशासनाला हाताशी धरून स्वयं अर्थसहाय्यित शाळा मध्ये वेगवेगळ्या उद्देशाने हस्तक्षेप करतात. अशा घटनांतून पुढे घडल्यास जशास तसे उत्तर देऊ : संभाजी घाडगे, नूतन जिल्हाध्यक्ष
………………….
यांच्या झाल्या निवडी
प्रदेशाध्यक्ष हरीश शिंदे, राज्य सचिव गणेश नीळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, जिल्हाध्यक्ष संभाजी घाडगे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार, जिल्हा सचिव शरद अनंतकळवस, जिल्हा संघटक गणपत मोरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी हरिश्चंद्र गाडेकर यांच्या नियुक्तया करण्यात आल्या. कोअर कमिटी मध्ये हरीष शिंदे, गणेश नीळ, अमोल सुरवसे, डॉ.संतोष वलगे, कृष्णदेव मदने, यांचा समावेश करण्यात आला.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago