Categories: करमाळा

करमाळ्यात 15 ते 21 मे दरम्यान स्नेहगंगामाई आळंदीकर यांच्या शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन – श्रेणिकशेठ खाटेर*

*
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहगंगा माई आळंदीकर यांच्या शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन दि. 15 मे ते 21 मे या कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांनी दिली आहे.
करमाळा शहरात यापूर्वी विविध धार्मिक कथांचे यशस्वी आणि भव्य आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये ओतूरकर महाराजांची भागवत कथा, पंडित प्रदीप कुमार मिश्रा यांची शिव महापुराण कथा, रामराव ढोक महाराज यांची रामकथा तसेच भगवानजी शर्मा यांची 1999 मध्ये भागवत कथा व 2001 मध्ये रामकथा, आणि अनुराधा दीदी यांची 2024 मध्ये भागवत कथा यांचा समावेश आहे. या धार्मिक परंपरेला पुढे नेत अधिकमासाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील भाविकांना शिव महापुराण कथेचा लाभ मिळावा आणि पुण्यसंचय व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात सोमवार, दि. 5 एप्रिल रोजी संत गजानन महाराज मंदिर करमाळा येथे नियोजन बैठक पार पडली. या बैठकीस श्रेणिकशेठ खाटेर, विठ्ठलराव भणगे, कुरुलकर मॅडम, नगरसेवक दीपक चव्हाण रवींद्र विद्वत, चरणसिंग परदेशी, नारायण पवार, विजय देशपांडे, बबलू कुलकर्णी, पत्रकार दिनेश मडके, गिरीश शहा, दादासाहेब तनपुरे, प्रितम वीर शंकर रासकर, , राम टांगडे, सचिन सोरटे, सौ. संगीताताई खाटेर, हनुमान परदेशी, संदीप चुंग, आशिष बोरा, दिनेश मुथ्था, वैभव दोशी कांलिदी धोकेटे, कालीदास घोगरे, आडकर सर, विनोद कानडे, दिलीप शिरगिरे, मुळे सर, सुरेश आटोळे, देवकर काका उपस्थित होते.
बैठकीत शिव महापुराण कथा भव्य आणि दिव्य स्वरूपात करण्याचा संकल्प करण्यात आला. करमाळा तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago