करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या हनुमान चालीसा पठण उपक्रमाने सलग 151 आठवड्यांचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला असून, या निमित्ताने संपूर्ण तालुक्यात भक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.
सुरुवातीला केवळ 13 भक्तांच्या उपस्थितीत सुरू झालेला हा उपक्रम आज भव्य स्वरूप धारण करून 40 पेक्षा अधिक गावांमध्ये पोहोचला आहे. दर शनिवारी 5000 हून अधिक भक्त या उपक्रमात सहभागी होत असून, करमाळा तालुका भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघत आहे.
या यशामागे हिंदू समाजाची एकजूट आणि श्रद्धा हेच मुख्य बळ ठरले आहे. समाज एकत्र आल्यानेच हा उपक्रम इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
करमाळा शहरातील मारुती मंदिरात दर शनिवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे हा महाप्रसाद उपक्रमही अखंडपणे सुरू असून, भक्त मोठ्या भक्तिभावाने त्याचा लाभ घेत आहेत.
लहानांपासून थोरांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत, त्यामुळे समाजात एकात्मता आणि धार्मिक संस्कार अधिक दृढ होत आहेत.
आज परिस्थिती अशी आहे की, हनुमान भक्तीची जणू लाटच सर्वत्र पसरली आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक मनात हनुमान नामाचा जयघोष घुमत आहे.
प्रभू श्रीरामांच्या कृपेने सुरू असलेले हे कार्य भविष्यात आणखी व्यापक स्वरूप धारण करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…