करमाळा, येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी बंक बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदर बेडचा उदघाट्न कार्यक्रम पार पडला.यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमशाळेचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने हे होते.
———— आश्रमशाळेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांनी समाजातील उपेक्षित, वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रगती पोहचवायची असेल, तर शिक्षण हेच एकमेव प्रभावी साधन आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहत मिळालेल्या शैक्षणिक संधीचे सोने करावे.
– प्रा. गणेश करे – पाटील, यशकल्याणी प्रमुख
———– उपेक्षित, वंचित घटकातील मुले आश्रमशाळेत शिक्षण घेतात. त्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शाळेच्या प्रवाहात आलेल्या मुलांनी शिक्षण घेवून त्यांचे भविष्य उज्वल करण्यावर भर दिला पाहिजे.
– रामकृष्ण माने, संस्थापक एकलव्य आश्रमशाळा
–मुलांनी मोठी स्वप्ने पाहावीत, स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे वाटचाल केल्यास मदतीचे हात मिळत राहतात.
– आशपाक सय्यद, जेष्ठ पत्रकार,
—-आश्रमशाळेची वाटचाल प्रभावी आहे. समाजातील दानशूर प्रतिनिधीनी शाळेसाठी मदत केळी पाहिजे. शाळेच्या प्रगतीसाठी सातत्याने सहकार्य करण्यावर भर दिला पाहिजे.
– दिनेश मडके, डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना तालुकाध्यक्ष करमाळा
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…
करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…