भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना, करमाळा यांच्या वतीने शहरातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी बोलताना नासीर कबीर म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन मानले. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही,” या त्यांच्या विचारातून शिक्षणाची ताकद स्पष्ट होते. शिक्षणाच्या बळावरच अन्याय, अज्ञान आणि विषमता दूर करून समाजात समता प्रस्थापित करता येते, असे त्यांनी नमूद केले.
तसेच, डॉ. आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून केवळ अभिवादन न करता त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच खरी आदरांजली ठरेल. प्रत्येकाने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके, सचिव नरेंद्रसिंह ठाकूर, सहसचिव तुषार जाधव, प्रसिद्धी प्रमुख सचिन चव्हाण मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार अशोक नरसाळे यांच्यासह पत्रकार जयंत दळवी, पत्रकार रितेश कटरीया, रमेश आगरवाल आदी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…