कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या नूतन सभापती सौ. पूजा ताई ढेरे या होत्या. यावेळी उपसभापती ॲड. अजित विघ्ने, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, पंचायत समिती सदस्य नाना झाकणे, स्वप्नील काळे, सौ. सोनाली नितीन तकीक यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे महत्त्व सांगितले.
डॉ. आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत दिलेले मोलाचे योगदान, तसेच समाजातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य याची आठवण उपस्थितांनी करून दिली. त्यांच्या समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचा अंगीकार करून समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतो, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत उत्साही व प्रेरणादायी होते. उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा आणि त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…