करमाळा प्रतिनिधी . करमाळा शहर व तालुक्यात एकूण १८६ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यात तब्बल ५२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आला आहे .करमाळा तालुक्यात पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाटयाने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आज करमाळा शहरात ८१ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये १९ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यामध्ये करमाळा शहरातील . कृष्णाजी नगर 4 ,दत्तपेठ 1 ,कुंकू गल्ली – 2,जामखेड रोड 1,महेंद्रनगर 3 ,संभाजी नगर 2,मेनरोड 1,गणेश नगर 3,घोलप नगर 2 पुरुष आहेत. तर ग्रामीण भागात १०५ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या असून यात ३३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जेऊर 2,वडगाव 1,देवीचामाळ 1 ,जातेगाव 1, चिखलठाण 1 ,पोथरे 12,कंदर 4 सांगवी 10,कुर्डुवाडी 1 यामध्ये आज तब्बल २१ जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत ४६६ कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी सोडले आहे. सध्या ३०० जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८२ वर जावून पोहोचली आहे. करमाळा शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून नागरिकांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे. करमाळा शहरात ग्रामीण भागातील नागरिक जास्त गर्दी करताना दिसत आहेत. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. नागरिकांनी आता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…