Categories: करमाळा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर १९ एप्रिल रोजी पिंपळवाडीत ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा

करमाळा : प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील पिंपळवाडी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाची वार्षिक यात्रा यंदा अक्षय तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर, रविवार दिनांक 19 जून 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या यात्रेनिमित्त संपूर्ण गावात धार्मिक व सांस्कृतिक वातावरणाची निर्मिती झाली असून भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे 6 वाजता महाअभिषेक होणार असून सकाळी 9 वाजता देवाला पोशाख व निशाण चढविण्यात येणार आहे. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पतार भरण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. सकाळी 11 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत शेरण्यांचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 10 वाजून 5 मिनिटांनी उत्सव मूर्ती मानकऱ्याच्या घरातून मंदिराकडे आणण्यात येईल. त्यानंतर रात्री 11 वाजता छबीना मिरवणूक काढण्यात येणार असून पहाटे 6 वाजता आरतीने उत्सवाची सांगता होणार आहे अशी माहिती पुजारी अमोल पुजारी यांनी दिली आहे.
यात्रेचे विशेष आकर्षण म्हणून ‘राजमुद्रा बॅन्जो’ पथकाची उपस्थिती राहणार आहे. तसेच ‘माहे डेकोरेशन’ यांच्या वतीने करण्यात येणाऱ्या आकर्षक लाईट सजावटीमुळे संपूर्ण परिसर उजळून निघणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ही यात्रा उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. मधुकर काळे, विजय भांडवलकर, वैजनाथ बनकर, हरी गरड, शामराव जाधव, पांडुरंग बनकर, मधुकर दिवाण, सुहास काळे पाटील, बबन काळे पाटील, अरुण जाधव, अण्णा काळे, सुभाष काळे, मनोहर पवार, अमोल काळे महाराज यांच्यासह गावातील प्रमुख मान्यवर परिश्रम घेत आहेत.
भैरवनाथ उत्सव कमिटीच्या वतीने करमाळा तालुक्यातील नागरिकांनी या यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त मोठी गर्दी होण्याची शक्यता असून सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

20 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago