Categories: करमाळा

केम येथे भावाचा गळा आवळून खून; बहिणीसह मेहुण्याला अटक करमाळा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम येथे आढळलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा करमाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत खून झाल्याचे निष्पन्न केले असून, या प्रकरणी मृताची बहीण व मेहुण्याला अटक करण्यात आली आहे.
दि. १२ एप्रिल रोजी केम येथील दत्तात्रय तुकाराम देवकर यांच्या शेती गट क्रमांक ५२७ मधील विहिरीच्या भरावाजवळ मकवानाच्या गंजीच्या आडोशाला एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृताची ओळख मल्हारी पोपट कांबळे (वय ३८) अशी पटली. प्रारंभी या घटनेची नोंद करमाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (क्र. ३८/२०२६) म्हणून करण्यात आली होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर यांनी मृताच्या नातेवाईकांकडून चौकशी केली असता, मृतास दारूचे व्यसन असल्याचे सांगण्यात आले. तसेच मृत्यूबाबत कोणावरही संशय नसल्याचे कुटुंबीयांनी नमूद केले. मात्र, शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा (गु.र. नं. ३४९/२०२६, भा.न्या.सं. कलम १०३(१)) दाखल केला.
यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी गुन्हे अन्वेषण पथकासह घटनास्थळी भेट देत सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान मृताची बहीण शीतल राजू केंगार व तिचा पती राजेश बापू केंगार यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांची कसून चौकशी करण्यात आली.
चौकशीत शीतल केंगार हिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्या म्हणण्यानुसार, मृत मल्हारी कांबळे हा दररोज दारू पिऊन घरी येऊन वाद घालत असे. या सततच्या त्रासाला कंटाळून ११ एप्रिल रोजी रात्री तो दारूच्या नशेत घरी आल्यावर पुन्हा भांडण करू लागला. संतापाच्या भरात शीतल हिने ओढणीने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पती राजेश केंगार यांच्या मदतीने दोघांनी मृतदेह खांद्यावरून नेऊन शेतात टाकून दिला.
या कबुलीनंतर पोलिसांनी शीतल राजू केंगार (वय ३२) व राजेश बापू केंगार (वय ३०, दोघे रा. केम, ता. करमाळा) यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी जाधव, अजित उबाळे, आप्पा लोहार, महेश डोंगरे, भाऊराव शेळके, मनीष पवार, वैभव ठेंगल, अर्जुन गोसावी, हनुमंत भराटे, अमोल रंदिल यांनी सहभाग घेतला.
करमाळा पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर गुन्ह्याची जलद उकल झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

19 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago