Categories: Uncategorized

करमाळ्यात काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष प्रतापराव नामदेवराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील महिलांसाठी 24 एप्रिलला निशुल्क देवदर्शन यात्रा

                                                                                  करमाळा प्रतिनिधी: देशभक्त कै. नामदेवरावजी जगताप   प्रतिष्ठानतर्फे मा. श्री. प्रतापराव नामदेवरावजी जगताप (तालुकाध्यक्ष, काँग्रेस आय कमिटी, करमाळा) यांच्या २४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी विशेष निशुल्क देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात स्वागत होत आहे.
ही यात्रा २४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ३ वाजता करमाळा येथील नामरत्न कॉम्प्लेक्स, मेन रोड येथून प्रस्थान करणार आहे. यात्रेचा मार्ग गाणगापूर – अक्कलकोट – तुळजापूर – यरमाळा असा असून पुन्हा करमाळा येथे परत येणार आहे.
यात्रा केवळ महिलांसाठी असून पूर्णतः निशुल्क आहे. श्रद्धा आणि अध्यात्म यांचा संगम साधत महिलांना सुरक्षित आणि सोयीस्कर पद्धतीने देवदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रतिष्ठानचा उद्देश आहे.
देवदर्शन यात्रा संपन्न करण्यासाठी नितीन चोपडे गणेश फलफले , सुजय जगताप आणि प्रतिक जगताप यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
देशभक्त कै. नामदेवरावजी जगताप प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे वाढदिवस साजरा करण्याची एक सामाजिक सेवाभावी परंपरा पुढे नेली जात असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago