Categories: Uncategorized

करमाळ्यात आज राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या प्रकल्पांचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती


करमाळा प्रतिनिधी 
करमाळा तालुक्यातील कुईवाडी रोड, बेंद फाटा येथे आज राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारण्यात आलेल्या विविध कृषी प्रकल्पांच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ठीक 10.00 वाजता हा कार्यक्रम होणार असून, यानिमित्ताने शेतकरी मेळावाही आयोजित करण्यात आला आहे.
या उद्घाटन सोहळ्यात ऍग्रो मॉल, औजार बँक, पॅक हाऊस, कोल्ड स्टोरेज, 60 टनी वजनकाटा तसेच BRC युनिटचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या अत्याधुनिक सुविधांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना उत्पादन साठवण, प्रक्रिया आणि विक्रीसाठी मोठी मदत होणार असून, कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे (करमाळा), डी.डी.एम. नितीन शेळके (सोलापूर), तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके (करमाळा), बँक ऑफ इंडिया मॅनेजर शीतल मटकर, जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले (सोलापूर), उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे (कुईवाडी), एल.डी.एम. राम वाखरडे (सोलापूर), सौ. लता तिकटे (जलप्रिय शेतकरी उत्पादक कंपनी, भूम), अजय कुमार बागल (बी.टी.एम., करमाळा) हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे (सोलापूर), पंचायत समिती सदस्य भरत अवताडे (करमाळा), एसबीआय बँक मॅनेजर सुनील बिडगर, दिनेश पाटील (आपली ऍग्रो शेतकरी उत्पादक कंपनी, धाराशिव व सर्व संचालक), वॉटर टीम धाराशिव, सभापती पंचायत समिती करमाळा सौ. पुजाताई ढेरे, कांतीलाल गीते (प्रकल्प व्यवस्थापक, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, धाराशिव), डॉ. अमोल गोफणे (श्री योगिराना शेतकरी उत्पादक कंपनी, परांडा व सर्व संचालक), सौ. अर्चना आवटे (श्री भगवंत महिला शेतकरी उत्पादक कंपनी, बार्शी व सर्व संचालक) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago