Categories: Uncategorized

दत्तकला ग्रुप ऑफ इंस्टीट्युशन्स या महाविद्यालयास UGC कडून 2 (F) मान्यता स्वायत्ततेकडे भक्कम वाटचाल, NEP 2020 अनुषंगाने आधुनिक शिक्षणाला चालना प्रा. रामदास झोळ*

 

करमाळा प्रतिनिधी “दत्तकला शिक्षण संस्था” संचलित “दत्तकला ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन्स” या महाविद्यालयास युजीसी (University Grants Commission) च्या कलम 2 (F) अंतर्गत मान्यता प्राप्त झाली असून, यामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला अधिक बळकटी मिळाली आहे. या मान्यतेमुळे महाविद्यालयास विविध शासकीय योजना, अनुदाने व शैक्षणिक प्रकल्पांसाठी पात्रता प्राप्त झाली आहे.
महाविद्यालयात पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) स्तरावरील विविध अभ्यासक्रम राबविले जात असून, अभियांत्रिकी (Diploma, BE, ME), व्यवस्थापन (MBA, MCA, BBA, BCA) व आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित शाखांमध्ये शिक्षण दिले जाते. संस्थेमध्ये सध्या सुमारे ५००० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी महाविद्यालयात कृत्रिम बु‌द्धिमत्ता (AI), Internet of Things (IoT) तसेच Industry 4.0 यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे “AI Farming” या अभिनव उपक्रमा‌द्वारे शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर शिकविण्यात येत आहे.
महावि‌द्यालयाने University of Science and Technology, Philippines, या परदेशी विद्यापीठाशी तसेच Bharat Sanchar Nigam Limited तसेच NVIDIA यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांशी सामंजस्य करार (MOU) करून विद्यार्थ्यांना अंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे.
तसेच, National Education Policy 2020 (NEP 2020) नुसार महाविद्यालयात शिक्षण पद्धतीत आवश्यक बदल करण्यात आले असून, बहुविषयक शिक्षण, Academic Bank of Credits (ABC), तसेच SWAYAM व MOOCs सारख्या ऑनलाइन अभ्यासक्रमांची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी NAAC मानांकन प्रक्रिया पूर्ण केली असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कौशल्याधारित उपक्रम राबविले जात आहेत.
संस्थेच्या या प्रगत उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व स्पर्धात्मक शिक्षणाची संधी उपलब्ध होत असून, त्यांना रोजगारक्षम बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जात आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी महावि‌द्यालयाच्या सर्व टीमचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ, विशाल बाबर, प्राचार्य डॉ. एस ए. पाटील तसेच संचालक डॉ. श्रीकांत साळुंके व सर्व कर्मचारी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे यश शक्य झाल्याचे नमूद केले.
प्रा. झोळ यांनी सांगितले की, “संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व घटकांनी केलेले सामुहिक प्रयत्न व गुणवत्तेवर दिलेला भर यामुळेच आज हे यश प्राप्त झाले आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांना अत्याधुनिक व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याचा आमचा संकल्प आहे.”
संस्थेच्या या यशामुळे ग्रामीण भागातील वि‌द्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्याचा मार्ग अधिक सुकर झाला असून, शिक्षण क्षेत्रात दत्तकला महावि‌द्यालयाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago