आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना (ह्यूमन राइट्स) च्या करमाळा तालुकाध्यक्षपदी दिनेशकुमार हुकुमचंद मुथा यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे व महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली ही निवड जाहीर करण्यात आली आहे
करमाळा तालुक्यात सामाजिक व मानवाधिकार विषयांवर कार्यरत असलेल्या मुथा यांच्या निवडीमुळे स्थानिक पातळीवर संघटनेच्या कामाला अधिक गती मिळणार आहे संघटनेच्या धोरणानुसार तालुक्यातील नागरिकांचे हक्काचे संरक्षण, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे आणि विविध प्रश्नांवर जनजागृती करणे यावर भर दिला देणार आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना दिनेशकुमार मुथा यांनी सांगितले की, संघटनेच्या नियमांचे पालन करत पारदर्शक व जबाबदारीने काम करणार असून, करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे युवकांना मानवाधिकार विषयक जागरूक करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, दिनेश कुमार मुथा यांच्या निवडीचे करमाळा तालुक्यासह संघटनेच्या राज्य व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…