Categories: करमाळा

करमाळा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  प्रतापराव जगताप यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा; 130 महिलांची मोफत देवदर्शन यात्रा, 190 जणांना एसटी सवलत कार्ड

 

करमाळा (प्रतिनिधी):
करमाळा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. श्री. प्रतापराव नामदेवराव जगताप यांचा वाढदिवस (दि. 24 एप्रिल 2026) यंदा अनावश्यक खर्चाला फाटा देत विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात आणि आदर्श पद्धतीने साजरा करण्यात आला. कै. नामदेवरावजी जगताप प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमध्ये महिलांसाठी मोफत देवदर्शन यात्रा, एसटी सवलत कार्ड शिबिर तसेच अन्नदान अशा उपक्रमांचा समावेश होता.
या उपक्रमांची सुरुवात दि. 18 एप्रिल 2026 रोजी नामरत्न कॉम्प्लेक्स येथे आयोजित एसटी महामंडळाच्या सवलत कार्ड शिबिराने झाली. या शिबिरात शहरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. एकूण 190 लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला, ज्यामुळे प्रवास सुलभ होण्यास मदत होणार आहे.
वाढदिवसानिमित्त मुख्य आकर्षण ठरलेल्या मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन दि. 24 एप्रिल रोजी करण्यात आले. पहाटे 2.30 वाजता एसटी महामंडळाच्या तीन सुसज्ज बसचे पूजन करून यात्रेला प्रारंभ झाला. करमाळा–गाणगापूर–अक्कलकोट–तुळजापूर–येरमाळा असा हा धार्मिक प्रवास पार पडला. यात्रेसाठी शहरातील 130 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
अक्कलकोट येथे सर्व महिला भगिनींच्या उपस्थितीत प्रतापराव जगताप यांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करण्यात आली. या प्रसंगी धार्मिक वातावरणात भाविकांनी भक्तीभावाने सहभाग घेतला. कार्यक्रमाला श्रीमती रत्नप्रभा नामदेवरावजी यांचीही उपस्थिती होती.
यात्रेदरम्यान टेभूर्णी येथील वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी जपली गेली. तसेच दिवसभर प्रचंड उष्णता (सुमारे 43 अंश सेल्सिअस) लक्षात घेऊन आयोजकांनी प्रत्येक महिलेस टोपीचे वितरण केले. प्रत्येक बसमध्ये थंड पिण्याच्या पाण्याचे पाच जार उपलब्ध करून देण्यात आले होते. संपूर्ण यात्रेदरम्यान उत्कृष्ट नियोजन आणि सोयी-सुविधांमुळे महिलांनी समाधान व्यक्त केले; काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रूही दिसून आले.
ही देवदर्शन यात्रा त्याच दिवशी रात्री 12.15 वाजता करमाळ्यात परतली. यावेळी सर्व महिलांच्या उपस्थितीत प्रतापराव जगताप यांचा वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. अनेक महिलांनी आपल्या मनोगतातून आयोजकांचे आभार मानत अशा उपक्रमांचे कौतुक केले.
या यात्रेत करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मा. श्री. चिंतामणी (दादा) जगताप, करमाळा नगरपालिकेचे माजी बांधकाम समिती सभापती मा. श्री. राहुल भैय्या जगताप, तसेच पृथ्वीराज जगताप, विश्वराज जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण वाढदिवस कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कै. नामदेवरावजी जगताप प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. वाढदिवसाचे औचित्य साधत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा हा आदर्श उपक्रम ठरला असून परिसरात त्याचे कौतुक होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago