करमाळा प्रतिनिधी. कोरोना महामारीमुळे मानवी जीवनावर मोठे संकट निर्माण झाले असून करमाळा शहर व ग्रामीण भागात कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख़्या दिवसेंदिवस वाढत आहे अशा गंभीर परिस्थितीत कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वेळेवर ऑक्सिजन व्हेटींलेटरसह पंचवीस बेडची वैद्यकिय सुविधा उपजिल्हा रुग्णालयामार्फत उपलब्ध करून देणे काळाची गरज असुन ही सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत भाऊ आवताडे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. करमाळा तालुक्यात वैद्यकीय सुविधा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मोठे सर्व सुविधांनी युक्त मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल नसल्याने अनेक नागरिकांना वेळेवर ऑक्सिजन व्हेटींलेटर सुविधा न मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागले आहेत यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. सरकारी उपजिल्हा रुग्णालय .यंत्रणा असून येथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने व प्रशासनाने याचे गांभीर्य न घेतल्यामुळे नागरिकांना कोरोना महामारीच्या काळात आपला जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन व्हेटींलेटर सुविधा झाल्यास करमाळा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय दुर होऊन गंभीर परिस्थिती असलेल्या सिरीयस रुंग्णाची सोय होऊन त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी मदत होणार आहे.तरी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात लवकरात लवकर सर्व सुविधायुक्त आॅक्सिजन व्हेटींलेटर व पंचवीस बेडची सुविधा करून देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत भाऊ आवताडे यांनी केली आहे.
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड जिल्हाध्यक्ष चेतनसिंह…
करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शहर मंडल…
करमाळा प्रतिनिधी मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे लोकनियुक्त सरपंच कै. संतोष पंडितराव देशमुख यांची…
करमाळा प्रतिनिधी १५ ते २० देशांतून भ्रमंती करून ज्ञानसंग्रह करणारे राहुल रसाळ आणि गेल्या ५०…
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…