Categories: Uncategorized

पंढरपुरात अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना व ट्युलिप हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न; ६० जणांची तपासणी, ३० आयुष्मान भारत कार्ड नोंदणी

पंढरपूर प्रतिनिधी : पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेले भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर पंढरपुरात उत्साहात पार पडले. अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना आणि ट्युलिप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.
या शिबिरामध्ये पंढरपूर शहर व परिसरातील सुमारे ६० पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आजारांबाबत तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले तसेच आवश्यकतेनुसार औषधोपचारही देण्यात आले. यासोबतच ३० जणांची आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आली.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकारांच्या अनियमित जीवनशैलीमुळे त्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते, त्यामुळे अशा शिबिरांचे आयोजन अत्यंत गरजेचे असल्याचे नमूद केले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉक्टर प्रशांत निकम यांच्यासारख्या व्यक्तींमुळे अशा उपक्रमांना बळ मिळते, असेही त्यांनी सांगितले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी ट्युलिप हॉस्पिटल व संघटनेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. पत्रकारांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हे कार्य अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजकुमार शहापूरकर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकारांचे काम अनियमित स्वरूपाचे असल्याने त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते, त्यामुळे अशा शिबिरांची आवश्यकता अधोरेखित होते, असे सांगितले. हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, राज्य तांत्रिक सल्लागार नागेश सुतार, जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेच्या वतीने डॉ. प्रशांत निकम यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तालुकाध्यक्ष नामदेव लकडे, शहराध्यक्ष सोहन जयस्वाल, उपाध्यक्ष अजित देशपांडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिनेश खंडेलवाल यांनी विशेष परिश्रम घेतले. ट्युलिप हॉस्पिटलचे डॉ. किरण झिटे, डॉ. राहुल हजनाळे, डॉ. प्राची भोसले, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर संतोष कोकाटे तसेच सर्व डॉक्टर व कर्मचारी, तालुका आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि आशा सेविकांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकृष्ण भाले यांनी केले, तर प्रशांत माळवदे यांनी आभार प्रदर्शन मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago