Categories: करमाळा

बागेश्वर बाबांच्या वक्तव्याविरोधात करमाळ्यात काँग्रेस आक्रमक; बंदी व अटकेची मागणी

करमाळा, प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून करमाळा तालुका काँग्रेस (आय)ने तीव्र निषेध व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांच्यावर महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घालावी तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
प्रतापराव जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या पराक्रम, स्वराज्य स्थापनेची ध्येयवेड आणि लोककल्याणकारी राज्यकारभार यामुळे ते प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराचे स्थान राखून आहेत. अशा महान व्यक्तिमत्त्वाविषयी चुकीची व इतिहासाचे विकृतीकरण करणारी वक्तव्ये करणे ही अत्यंत गंभीर बाब असून ती अजिबात सहन केली जाणार नाही.
ते पुढे म्हणाले की, इतिहासाची पुरेशी माहिती नसताना सार्वजनिक व्यासपीठावरून बेताल वक्तव्ये करणे ही केवळ गैरजबाबदारपणाची नव्हे तर समाजात तेढ निर्माण करण्याची बाब आहे. अशा वक्तव्यांमुळे शिवप्रेमींच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित व्यक्तीने सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अन्यथा राज्यात त्यांच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या निवेदनाची प्रत करमाळा पोलीस निरीक्षकांनाही देण्यात आली असून संबंधितांवर त्वरित गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनाद्वारे काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करत शिवाजी महाराजांविषयी कोणताही अवमान सहन केला जाणार नसल्याचा इशाराही दिला.
या प्रसंगी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष साहेबराव विठ्ठल वाघमारे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सुजय यशवंत जगताप, चंद्रकांत उत्तम साळवे, शिवाजी त्रिंबक आवटे, देविदास रघुनाथ कांबळे, सुदाम संभाजी यादव, बाळनाथ सुखदेव रोडे, प्रतीक संभाजी जगताप, निलेश सुरेश पवार, योगेश सुरेश राखुंडे, सोमनाथ अशोक राखुंडे, नितीन दत्तात्रय चोपडे, अभिमान अर्जुन लष्कर, नितीन मारुती चिंचकर, किरण सूर्यकांत साळुंखे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

4 hours ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

10 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago