करमाळा शहरात सर्वधर्म समभाव, सामाजिक ऐक्य आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे यांनी दिली.
रविवार, १० मे २०२६ रोजी पार पडणाऱ्या या भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चांदगुडे प्लॉट, बायपास रोड येथे विधिवत पूजन करून मैदान स्वच्छता, सजावट आणि मंडप उभारणीच्या कामांना प्रारंभ करण्यात आला. परिसरात सध्या लगबगीचे वातावरण असून कार्यकर्ते नियोजनबद्ध पद्धतीने तयारीत व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यावेळी बोलताना गणेश भाऊ चिवटे म्हणाले की, “सर्वधर्मसमभाव जपत समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणणारा हा एक अनोखा सोहळा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील वधू-वरांना सन्मानाने विवाहबद्ध करण्याचा आमचा प्रयत्न असून, त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे हेच या उपक्रमामागील मुख्य उद्दिष्ट आहे.”
ते पुढे म्हणाले की, समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम दरवर्षी अधिक व्यापक होत आहे. श्रीराम प्रतिष्ठानचा प्रत्येक कार्यकर्ता हा हा सोहळा स्वतःच्या घरचा समजून काम करत असून, या माध्यमातून समाजात बंधुभाव आणि एकोप्याची भावना अधिक दृढ होत आहे.
यंदा या सामुदायिक विवाह सोहळ्याचे चौथे वर्ष असून, अधिक नियोजनबद्ध आणि सुविधायुक्त पद्धतीने कार्यक्रम पार पाडण्यावर भर देण्यात आला आहे. वधू-वरांसाठी आवश्यक साहित्य, भोजन व्यवस्था, निवास तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यामुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.
या उपक्रमामुळे करमाळा तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरांतून या सोहळ्याचे स्वागत आणि कौतुक होत आहे. सामाजिक एकात्मता आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणारा हा उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या वेळी महाराष्ट्र चॅम्पियन अफसर तात्या जाधव, नगरसेवक रामभाऊ ढाणे, विजय घोलप, उद्योगपती राजूकाका शीयाळ, भाजपाचे ज्येष्ठ नेते संजयअण्णा घोरपडे, विलास आबा जाधव, भीष्माचार्य चांदणे, बाळासाहेब गोरे गुरुजी, अमोल पवार, नितीन झिंजाडे, सोमनाथ घाडगे, सचिन गायकवाड, बंडू शिंदे, दादा देवकर, जयंत काळे पाटील, संतोष काका कुलकर्णी,दिनेश मडके, नितीन निकम, सचिन भणगे, प्रमोद फंड, बाबा घोडके, स्वानंद वांगडे, हर्षद गाडे, संजय दुर्गुळे, राजेश पाटील, वसिम सय्यद, अशोक मोरे, संदीप काळे, गणेश गोसावी, विनोदी इंदलकर, भरत गुंड, संदीप रेगुडे, महेश दिवाण, प्रसाद कोकीळ, शैलेश राजमाने तसेच श्रीराम प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…