Categories: करमाळा

डिजिटल मीडिया पत्रकारांना न्याय देण्यासाठी राजा माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पत्रकारांना राजमान्यतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देणार- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

करमाळा प्रतिनिधी
अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या कार्याचे कौतुक करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक असून संघटनेला राजमान्यता मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. तसेच, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन सादर करण्यास आपण सहकार्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोवा येथील कला अकादमीमध्ये अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे समाजव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक असून समाजसेवेचे कार्य दोघेही करत असतात. विशेषतः समाजातील वंचित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. देशाच्या विकास प्रक्रियेत पत्रकारांचे योगदान अनन्यसाधारण असून शासनालाही याची जाणीव आहे.
गोवा राज्यात पत्रकारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये अधिस्वीकृती पेन्शन योजना, गृहनिर्माण योजना, पत्रकारांच्या कुटुंबासाठी वैद्यकीय विमा आदी सुविधांचा समावेश आहे. तसेच डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांनाही शासनाच्या चौकटीत राहून न्याय मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील, पंतप्रधान नरेंद्र मोदी आधुनिक डिजिटल भारताचे निर्माते असून त्यांना डिजिटल मीडिया क्षेत्राची चांगली ओळख व जाणीव आहे त्यामुळे डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकार संपादकांना ते नक्कीच न्याय देऊन केंद्र व राज्य पातळीवर धोरण निश्चित करून राज मान्यता देऊन पत्रकारांना न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत डिजिटल पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडल्या. डिजिटल माध्यमांना अधिकृत मान्यता मिळणे, पत्रकारांना पेन्शन, शासन जाहिराती पत्रकारांसाठी कुटुंबासाठी वैद्यकीय विमा, गृहनिर्माण योजना याबरोबरच कुटुंबाच्या कल्याणासाठी व पत्रकारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आणि कल्याणकारी योजनांचा विस्तार याबाबत त्यांनी विशेष भर दिला आहे.
अधिवेशनास स्वागताध्यक्ष सुभाष फळदेसाई, गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महाराष्ट्र महा अधिवेशन गोवा येथे पार पडले यावेळी गोवा राज्याचे मुख्यमंत्री नामदार डॉक्टर प्रमोद सावंत, गोव्याचे समाज कल्याण मंत्री नामदार सुभाष फळदेसाई , महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री म नामदार उदय सामंत पणजी गोव्याचे खासदार सदानंद शेठ तानवडे राज्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील साहेब भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राम कृष्ण वेताळ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील महेश कुगावकर, राष्ट्रीय महासचिव तेजस राऊत समन्वयक मुरलीधर चव्हाण महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत साहेब महाराष्ट्र महासचिव विकास भोसले, स्मरणिका संपादक भाऊसाहेब फास्के शशिकांत देशमुख सागर चव्हाण सूर्यकांत वाईकर धीरज शेळके भरत केसरकर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न झाले यांच्यासह सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी करमाळा तालुकाध्यक्ष दिनेश मडके सचिव नरेंद्र सिंह ठाकुर उपाध्यक्ष संजय साखरे सूर्यकांत होनप, सहसचिव तुषार जाधव कार्यवाह रवींद्र विघ्ने सदस्य आनंद माळी अंग देवकते अमोल भोसले यांच्यासह देशातील विविध राज्यांतील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रकट मुलाखत राजा माने यांनी घेतली. या मुलाखतीत बदलत्या राजकीय घडामोडी, विकासाच्या दिशा आणि धोरणात्मक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली.
एकूणच, या राष्ट्रीय अधिवेशनातून डिजिटल मीडिया पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून संघटनेच्या पुढील वाटचालीस नवे बळ मिळाले आहे

saptahikpawanputra

Recent Posts

औदुंबरराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! बंद पडलेली करमाळा–कुर्डूवाडी एसटी पुन्हा धावणार; परिवहन मंत्र्यांच्या आदेशाने ग्रामीण भागाला दिलासा

करमाळा (प्रतिनिधी) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील हजारो नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली करमाळा–कुर्डूवाडी एसटी बस सेवा…

23 hours ago

करमाळ्यात १० किलो गांजासह युवक जेरबंद ३.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरात अमली पदार्थांविरोधातील कारवाईत करमाळा पोलिसांना मोठे यश मिळाले असून, १०…

2 days ago

नुकसानीचे पंचनामे व वीज पुरवठा पूर्ववत ठेवणे बाबत माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन…

करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघामध्ये गेल्या २ महिन्यापासून कमी दाबाने होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे शेतीपंप…

4 days ago

आठ दिवसांत नेरले–गौंडरे रस्त्याचे काम सुरू करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

करमाळा प्रतिनिधी  नेरले, ता. करमाळा : नेरले ते गौंडरे या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिक, विद्यार्थी…

4 days ago

करमाळ्यात अत्याधुनिक कार्डियाक केअर युनिट व कॅथलॅबची सुविधा सुरू

  करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार व तातडीची हृदयरोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्याच्या…

4 days ago