करमाळा नगरपालिकेत शहरातील मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी घरपट्टीवरील व्याजात सूट देण्याचा ठराव सर्वपक्षीय सदस्यांच्या सहकार्याने मंजूर करण्यात आला होता. मात्र अनेक महिने उलटूनही या ठरावाची अंमलबजावणी न झाल्याने विरोधी पक्षाने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नागरिकांना यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून प्रशासनाचा ढिसाळ कारभार यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला.
माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते प्रशांत ढाळे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली. “लोकप्रतिनिधींनी मंजूर केलेल्या निर्णयाकडे प्रशासन दुर्लक्ष का करत आहे?” असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, घरपट्टीवरील व्याजमाफी लागू झाल्यास शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या अनेक नागरिकांना या निर्णयाची प्रतीक्षा असून प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
याचबरोबर शहरातील विविध नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याचा मुद्दाही विरोधी पक्षाने उपस्थित केला. काही भागांमध्ये नालेसफाईची कामे ठेकेदारांना देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात कामे पूर्ण झाली नसल्याचा आरोप करण्यात आला. पावसाळा तोंडावर असताना नाल्यांची सफाई न झाल्यास पाणी तुंबणे, दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी नगरसेवक युवराज चिवटे, नगरसेविका अश्विनी कांबळे-अब्दुले, सुवर्णा आलाट, सोफिया कुरेशी आदी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…