Categories: करमाळा

श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण १० मे रोजी महसूलमंत्री पालकमंत्री माजी खासदारांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत २५ जोडपी अडकणार विवाहबंधनात – गणेश चिवटे

 

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि संस्कार जपणारा श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा यंदा चौथ्या वर्षी अत्यंत भव्य स्वरूपात पार पडणार असून, रविवार दिनांक १० मे २०२६ रोजी चांदगुडे प्लॉटिंग, बायपास रोड, करमाळा येथे तब्बल २५ जोडपी विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे प्रमुख तथा भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी बोलताना ते म्हणाले की, “या विवाह सोहळ्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने सर्व व्यवस्था पूर्णपणे मोफत करण्यात आली असून, वधू-वरांचे पोशाख, मनी मंगळसूत्र, संसारोपयोगी साहित्य, भोजन व्यवस्था, मंडप, सजावट तसेच धार्मिक विधींसाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पारंपरिक आणि धार्मिक वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न होणार असून हजारो नागरिक उपस्थित राहणार आहेत.
विवाहस्थळी येणाऱ्या पाहुण्यांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय मदत केंद्र तसेच वाहनतळाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच २० ते २५ हजार वऱ्हाडी मंडळींसाठी भोजनाची भव्य व्यवस्था करण्यात आली असल्याचेही चिवटे यांनी सांगितले.यावेळी प्रत्येक नवरदेवाची कुटुंबाप्रमाणे हौस पूर्ण करण्यात येणार असून, घोड्यावरून ढोल-ताशांच्या गजरात बॅन्जो सह स्वतंत्र भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण करमाळा तालुक्यात या सोहळ्याबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या भव्य विवाह सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह भाजपचे जिल्ह्यातील आमदार , जिल्हा पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभाशीर्वाद देणार आहेत.
*विशेष म्हणजे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे १० मे रोजी दुपारी २ वाजता करमाळा येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तहसील कार्यालय येथे उपस्थित राहणार असून, जवळपास दोन तास नागरिकांच्या समस्या निवारणासाठी वेळ देणार आहेत*
त्यानंतर ते विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.या पत्रकार परिषदेस भाजप तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अफसर तात्या जाधव, रामभाऊ ढाणे, काकासाहेब सरडे, जगदीश अग्रवाल, नितीन झिंजाडे, ज्येष्ठ नेते संजय अण्णा घोरपडे, ॲड. भगवानगिरी गोसावी, बाळासाहेब गोरे गुरुजी, दादा देवकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीराम प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असून, सामुदायिक विवाह हा त्यातील एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम ठरत असल्याचे गणेश चिवटे यांनी सांगितले.विवाहातील अनावश्यक खर्च टाळून समाजहिताचे कार्य करण्याची प्रेरणा या उपक्रमातून मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

6 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

19 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

21 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago