शेलगाव क येथे आज दि.८ मे रोजी पूजा ,होम हवन करून हनुमंताच्या जुन्या मूर्तीचे विसर्जन व विधिवत नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली .याप्रसंगी २ दिवस कीर्तन, भजन अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. पंढरपूर येथून हनुमंताची मूर्ती आल्यानंतर त्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर सदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
नागनाथ महाराज यात्रा उत्सव समितीच्या वतीने उत्सवातील शिल्लक रकमेतून मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आलेले आहे.यात्रा उत्सवातून शिल्लक राहिलेल्या रकमेमधून गावातील सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केलेला आहे . यापूर्वी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून व विकास निधीतून गावातील जिल्हा परिषद शाळेचा व अंगणवाडीचा चेहरा मोहरा बदललेला आहे. आता मंदिरांचा चेहरा मोहरा बदलण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे.
मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी पुढाकार घेणारे आजिनाथ वीर व आत्माराम वीर यांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. प्रसाद व भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या AI डेटा सेंटर आणि विविध ऊर्जा प्रकल्पांविरोधात युवक…
सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…
करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…