Categories: Uncategorized

करमाळा नगरी शिवमय! अधिकमासानिमित्त भव्य शिव महापुराण कथा सप्ताहाचे आयोजन १५ ते २१ मे दरम्यान स्नेहगंगा शृंगारे माई आळंदीकर यांच्या सुमधुर वाणीतून होणार शिवकथांचा ज्ञानयज्ञ- श्रेणीक खाटेर

करमाळा प्रतिनिधी
पवित्र अधिकमासाच्या निमित्ताने करमाळा शहरात भक्ती, अध्यात्म आणि संस्कारांची अनोखी पर्वणी अनुभवायला मिळणार असून 15 मे ते 21 मे या कालावधीत संत गजानन महाराज मंदिर एसटी कॉलनी श्रीदेवीचा माळ रोड करमाळा येथे भव्य शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती संत गजानन महाराज भक्त परिवार यांच्यावतीने श्रेणीक खाटेर व श्रीमती रंजना कुरलकर मॅडम यांनी दिली आहे. आदरणीय सुश्री स्नेहगंगा शृंगारे माई आळंदीकर यांच्या सुमधुर व प्रभावी वाणीतून होणाऱ्या या कथा सप्ताहामुळे संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने भारावून जाणार आहे.
शुक्रवार दि. १५ मे २०२६ ते गुरुवार दि. २१ मे २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हा धार्मिक ज्ञानयज्ञ पार पडणार आहे. करमाळ्यातील श्री संत गजानन महाराज मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
शिवमहापुराणातील विविध प्रसंग, भगवान शंकरांचे चरित्र, भक्ती, अध्यात्म, संस्कार आणि जीवनमूल्यांचे प्रभावी निरूपण स्नेहगंगा शृंगारे माई आळंदीकर आपल्या अभ्यासपूर्ण शैलीतून करणार आहेत. त्यामुळे सात दिवस चालणारा हा कथा सप्ताह भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरणार आहे.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित नियोजन बैठकीत कार्यक्रम पत्रिका प्रकाशन व मंडप पूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. मुख्य यजमान श्री. श्रेणिक खाटेर, सौ. संगीता खाटेर तसेच श्रीमती रंजना कुरलकर मॅडम यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
बैठकीत कथा सप्ताहाचे सुयोग्य नियोजन, मंडप व्यवस्था, भक्तांसाठी सुविधा, प्रसाद वितरण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीच्या सदस्यांनी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. यावेळी सर्वांनी तन-मन धनाने शिवपुराण महाकथा भव्य दिव्य स्वरूपात करण्याचा मानस व्यक्त केला आहे .
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जगदीश शिगची तसेच सौ. कविता नीळ आटोळे मॅडम यांनी धार्मिक उपक्रम समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करतात, असे मत व्यक्त केले. अधिकमासाच्या पवित्र कालखंडात आयोजित कथा सप्ताहामुळे युवकांमध्ये संस्कार व समाजात ऐक्यभाव वाढीस लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिनेश मुथ्था यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री संत गजानन महाराज भक्त परिवार व समितीच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ आणि गणपतीची मूर्ती देऊन गौरविण्यात आले. हा सत्कार मुख्य यजमान श्री. श्रेणिक खाटेर यांच्या हस्ते करण्यात आला.
या नियोजन बैठकीस श्रेणिक खाटेर रवींद्र विद्वत, जगदिश शिगची,प्रदीप देवी, नारायण पवार, सुरेश चव्हाण, कचरूशेठ मंडालेचा, अर्जुन गंधे, गणेश बोरा ,शंकर रासकर, पत्रकार दिनेश मडके, विजय साळुंखे सर, दिनेश मुथ्था,,ॲड संकेत खाटेर वर्धमान खाटेर गिरीश शहा बापू शिरगिरे वैभव दोशी यांच्यासह महिला भगिनी सौ संगिता खाटेर, सौ. स्वाती मसलेकर, सौ.छाया देवकर, वैशाली कोळी, सौ रत्नमाला शिंदे, सौ कमल चव्हाण, सौ आशाबाई देशमुखे,सौ संगीता गुंड विना विद्वत, शिंदे काकू , चव्हाण आक्का,जिजी सातपुते,आडकर मॅडम,मनिषा कानडे श्रध्दा जोशी,सौ.आरती बोकन सोनु बोकन यांच्यासह भक्त परिवार, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Share
Published by
saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड व्हा. चेअरमनपदी निशांत खारगे, तर सचिवपदी अजित कणसे यांची निवड

  करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…

9 hours ago

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…

19 hours ago

चार हजार ऊसदरासाठी शेतकऱ्यांचा महामार्गावर एल्गार राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली कुंभेज फाट्यावर रास्ता रोको; नऊ मागण्यांसाठी शासनाला इशारा

करमाळा  प्रतिनिधी उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या नऊ…

1 day ago

सिव्हिल इंजिनिअर शैलेश खडके यांना मातृ शोक श्रीमती अंजली मधुकर खडके यांचे दुःखद निधन

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील शिवाजीनगरमधील रहिवासी तथा सिव्हिल इंजिनिअर प्रसिद्ध क्राॅन्ट्रक्टर श्री. शैलेश मधुकर खडके…

2 days ago

ग्लोबल डिफेन्स अकॅडमीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न!

  करमाळा प्रतिनिधी  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस, सैन्यदल, एनडीए व अग्निवीर यांसारख्या संरक्षण आणि शासकीय…

3 days ago