Categories: करमाळा

भाजप जिल्हा सरचिटणीस गणेशभाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २५ जोडपी विवाहबंधनात १०५ विवाहांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण; सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी सोहळा

करमाळा प्रतिनिधी –
करमाळा शहरात श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदाही अत्यंत उत्साहपूर्ण, दिमाखदार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या वातावरणात पार पडला. या भव्य विवाह सोहळ्यात तब्बल २५ जोडपी विवाहबंधनात अडकली असून श्रीराम प्रतिष्ठानने आजपर्यंत १०५ विवाहांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला आहे. या संपूर्ण उपक्रमामागे श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजप जिल्हा सरचिटणीस गणेशभाऊ चिवटे यांचे नेतृत्व, नियोजन आणि सामाजिक बांधिलकी विशेष ठरले आहे.
गेल्या चार वर्षांपासून गणेशभाऊ चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांना आधार देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला आता करमाळा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक समता, बंधुता आणि सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देणारा हा विवाह सोहळा तालुक्यात प्रेरणादायी ठरत आहे.
यंदाच्या विवाह सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे, माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, बार्शीचे माजी आमदार राजाभाऊ राऊत, आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार सजंयमामा शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहाजीभाऊ पवार, अविनाश महागावकर, चेतनसिंह केदार, रश्मीदीदी बागल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी नववधू-वरांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करत, “अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडते आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ होते,” असे सांगितले.
पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांनीही गणेशभाऊ चिवटे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत, “सर्वसामान्य कुटुंबांना आधार देत सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरेल,” असे मत व्यक्त केले.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी विवाह सोहळ्यास उपस्थित राहत नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांना आपला कायम पाठिंबा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
चौकट
गणेशभाऊ चिवटे यांच्या नेतृत्वातून सामाजिक उपक्रमाला नवी ओळख
श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे चौथे वर्ष होते. यापूर्वी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ७९ विवाह संपन्न झाले होते. यंदा २५ जोडप्यांचे विवाह यशस्वीरीत्या पार पडल्याने १०५ विवाहांचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन संस्थापक अध्यक्ष तथा भाजप जिल्हा सरचिटणीस गणेशभाऊ चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रतिष्ठानचे स्वयंसेवकही अत्यंत प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेतून कार्यरत राहिल्याने हा सोहळा यशस्वी ठरला.
चौकट
वधू-वरांना संसारोपयोगी साहित्याची भेट
या विवाह सोहळ्यामध्ये प्रत्येक वधू-वरांना संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात आले. यामध्ये मनी-मंगळसूत्र, जोडवे, बिचवे, हळदी व लग्नासाठी संपूर्ण कपडे, बूट-चप्पल आदी वस्तूंचा समावेश होता. सर्व नवरदेवांसाठी मिरवणुकीकरिता स्वतंत्र घोडा व बॅंजोची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मेकअपसाठी स्वतंत्र टीम, सर्व वऱ्हाडी मंडळींसाठी भोजन व्यवस्था, मानाची शिदोरी, प्रशस्त मंडप, स्पीकर, लाईट डेकोरेशन अशा सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
विवाह सोहळ्यादरम्यान संपूर्ण परिसरात आनंद, उत्साह आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले. तालुक्यातील नागरिक, वऱ्हाडी मंडळी आणि विविध समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गरजू कुटुंबांच्या आयुष्यात आनंद निर्माण करत समाजातील ऐक्य अधिक दृढ करणारा श्रीराम प्रतिष्ठानचा हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा करमाळा तालुक्यात सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

3 hours ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

9 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago