Categories: करमाळा

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती करमाळ्यात उत्साहात साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व तालुका उत्सव समितीच्या माध्यमातून स्वराज्याचे धाकले धनी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती बुधवारी (ता. १४) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जयंतीनिमित्त सकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पारंपरिक विधी पार पडले. यावेळी शिवभक्तांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दिवसभर लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक नागरिकांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.
संध्याकाळी शहरातून पारंपरिक सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीत घोडे, छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिकात्मक मूर्ती तसेच विविध ऐतिहासिक वेशभूषेतील मावळे सहभागी झाले होते. मिरवणुकीने शहरातील प्रमुख मार्गांवरून फेरफटका मारत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे आणि नागरिकांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार करत स्वाभिमान आणि धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago