Categories: करमाळा

करमाळा पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचा कारभार ‘रामभरोसे’; विकासकामांना ब्रेक, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष! ​ऐतिहासिक ‘सात विहीर’ परिसराची दुरवस्था; पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा पत्ता नाही; जगताप गटाचा प्रशासनावर कडाडून हल्ला

​
​करमाळा (प्रतिनिधी):
करमाळा शहराच्या विकासाचा रथ सध्या पूर्णपणे रुतलेला दिसत असून, नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे सर्वसामान्य नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत. ऐतिहासिक वारसा असलेल्या ‘सात विहीर’ (सात नळाची विहीर) परिसरातील दुरवस्था आणि पावसाळ्यापूर्वी करायच्या अत्यावश्यक कामांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
​‘सात विहीर’ परिसरातील विधींसाठी नागरिकांची फरफट
​करमाळा शहरातील ऐतिहासिक ‘सात विहीर’ हे केवळ एक ठिकाण नसून ते भावनेशी जोडलेले स्थळ आहे. अंत्यविधीनंतरचे दहाव्याचे विधी प्रामुख्याने याच ठिकाणी पार पडतात. मात्र, सध्या या विहिरीपाशी कोणतीही सोय शिल्लक नाही. प्रशासकीय काळात झालेल्या दुर्लक्षामुळे येथील शेड आणि कट्ट्याची अवस्था बिकट झाली आहे. आता पावसाळा तोंडावर असताना, विधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उघड्यावर बसावे लागणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. नगरपालिकेने तातडीने येथे बैठक व्यवस्था (कट्टा) आणि शेड उभारावे, अशी मागणी जोर धरत आहे.
​पावसाळा पूर्व कामे कागदावरच?
​शहरात पावसाळा सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत, तरीही सत्ताधाऱ्यांकडून कोणतीही हालचाल दिसत नाही.
​नाले आणि गटारींची सफाई: अनेक भागांत गटारी तुंबलेल्या आहेत.
​आरोग्य व्यवस्था: पेस्टिसाइड फवारणी अभावी डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे.
​पायाभूत सुविधा: रस्ते दुरुस्ती, स्ट्रीट लाईटचे मेंटेनन्स आणि पाईपलाईनची कामे ठप्प आहेत.
​ओपन स्पेस: शहरातील १२ ओपन स्पेस (बगीचे) देखभालीअभावी ओसाड पडत आहेत.
​वैभवराजे जगतापांच्या सुवर्णकाळाची आठवण
​२०१६ ते २०२१ या काळात नगराध्यक्ष श्री. वैभवराजे जयवंतराव जगताप यांनी अल्पमतात असूनही सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन शहराचा कायापालट केला होता. आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांचा प्रशासनावरील वचक आणि वैभवराजेंचे नियोजन यामुळे करमाळ्याने कोविडसारख्या महामारीवर यशस्वीपणे मात केली होती. मात्र, आज सत्ता मिळून सहा महिने उलटले तरी नवीन सत्ताधारी केवळ राजकारण आणि कामात अडथळे आणण्यात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे.
​”आम्हाली कोणावर टीका करायची नाही किंवा कोणाच्या कामात अडथळा आणायचा नाही. जगताप गट गेल्या ३० वर्षांपासून शहराच्या हितासाठीच कार्यरत आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या ‘गाढ झोपेतून’ जर त्यांनी लवकर जागं होऊन कामं सुरू केली नाहीत, तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होईल. हे वेळीच थांबवावे, अन्यथा जनतेचा रोष सहन करावा लागेल.”
— शंभूराजे जगताप.
​करमाळकरांचा सवाल: सत्ताधाऱ्यांना राजकारणातून वेळ मिळून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला सवड कधी मिळणार? पावसाळ्यात शहर जलमय होण्याची आणि साथरोग पसरण्याची वाट पालिका प्रशासन पाहत आहे का? असा मुद्दा उपस्थित होत आहे.
​रस्त्यावरील वीज दिव्यांचा प्रश्न: करमाळा शहरातील प्रभाग क्रमांक चार येथील ‘स्टेट हायवे ६३ ते अण्णासाहेब हायस्कूल’ या रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रचंड अंधार असतो. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता या रस्त्यावर तातडीने पथदिवे (स्ट्रीट लाईट्स) बसवण्यात यावेत, अशी आग्रही मागणी श्रीकांत राखुंडे यांनी चीफ ऑफिसर यांच्यासमोर मांडली.
​आरोग्याचा गंभीर प्रश्न व प्रशासनाचे दुर्लक्ष: पुढे बोलताना निलेश श्रीनिवास कांबळे यांनी कानड गल्ली येथील सार्वजनिक शौचालयाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. गेल्या महिनाभरापासून या शौचालयाचे ड्रेनेज टॅंक ओव्हरफ्लो (तुडुंब भरून वाहणे) झाले आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिकेला याबाबत वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
​सत्ताधाऱ्यांचा राजकीय पक्षपात आणि इशारा: केवळ शिवसेना पक्षाचे नगरसेवक ज्या प्रभागात निवडून आले आहेत, त्या प्रभागांमधील विकासकामे रखडवण्याचा आणि ती न करण्याचा विडाच विरोधकांनी (सत्ताधाऱ्यांनी) उचलला आहे. सत्ताधाऱ्यांच्या या राजकीय हेवेदाव्यांमुळे करमाळा शहरातील सामान्य आणि निष्पाप नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
​सत्ताधाऱ्यांनी हा राजकीय पक्षपात त्वरित थांबवावा आणि प्रभाग क्र. ४ मधील ड्रेनेज व पथदिव्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा. अन्यथा, शहरातील त्रस्त नागरिकांना सोबत घेऊन नगराध्यक्षांच्या दालनात तीव्र स्वरूपाचा धडक मोर्चा काढण्यात येईल, याची प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
​शिवसेना पक्षाचे विरोधी पक्ष नेते माजी नगर अध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री प्रशांत भैया ढाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व यासाठी करमाळा तालुक्याचे युवा नेते कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक खरेदी विक्री संघ चेअरमन शंभूराजे जगताप यांच्या उपस्थितीत हे निवेदन चीफ ऑफिसर मुख्य अधिकारी यांना देण्यात आले.
​करमाळा शहर जगताप गट संपर्क प्रमुख शिवराज भैय्या जगताप
​माजी उपनगराध्यक्ष अहमदचाचा कुरेशी नगरसेवक साजिदा कुरेशीनगरसेवक सुवर्णाताई आलाट नगरसेवक अश्विनी कांबळे अब्दुले नगरसेवक युवराज चिवटे ,आशुतोष शेलार,जरीमुन्निसा सय्यदराजू वाघमारे ,पल्लवीताई अंधारे अल्ताफ भाई तांबोळी संगीताताई खाटेर ,माधवीताई पोळ चंद्रकांत राखुंडे,मीनल ताई पाटोळे व इतर आदिमान्यवर उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago