Categories: करमाळा

करमाळा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवण्यासाठी सकल धनगर समाज आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन करमाळा नगरपरिषदेला निवेदन

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवण्यासाठी करमाळा नगरपरिषद यांनी गायकवाड चौक, करमाळा येथे जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी सकल धनगर समाज आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी एकत्रित येत आज करमाळा नगर परिषदेचे नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत , उपनगराध्यक्ष अतुल फंड आणि मुख्याधिकारी यांना दिले .

राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा करमाळा शहरामध्ये बसला पाहिजे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष पाहायला मिळत आहे परंतु अद्याप अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध झालेली नाही . व अहिल्यादेवींची 300 वी जयंती पूर्ण देशभर अतिशय उत्साहाने साजरी होत असताना करमाळा शहरात अहिल्यादेवींचा पुतळा बसला पाहिजे असा सूर समाज माध्यमातून उमटत होता . त्यामुळे आज सर्व स्तरातील सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध व्हावी याची मागणी लावून धरली .यावेळी डॉ श्रीराम परदेशी गणेश चिवटे , संजय सावंत , संतोष वारे , अमरजित साळुंखे ,शंभूराजे फरतडे ,हनुमंत मांढरे , जगदीश अग्रवाल , संजय घोलप ,शहाजी ठोसर , अभिषेक आव्हाड ,सचिन चव्हाण ,सचिन काळे , नरेंद्रसिंह ठाकूर, अशपाक जमादार, वनराज घोलप , मस्तकीम पठाण , दिनेश मुथा , आप्पा कोंढारे यांच्यासह सकल धनगर समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले , तसेच पत्रकारांची संवाद साधला . यावेळी नगराध्यक्ष सावंत , उपनगराध्यक्ष फंड आणि मुख्याधिकारी यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावेळी दिले आहे .

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

18 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

21 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago