करमाळा येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेतील कु. शिवांजली घाडगे व कु. विराज पोते या दोघांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निवड झाली असून संस्थेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
प्रा. डॉ. निकत सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. संस्थेतून एकूण 5 विद्यार्थी या परीक्षेसाठी सहभागी झाले होते. त्यापैकी कु. शिवांजली घाडगे हिने 150 गुण मिळवत तर कु. विराज पोते याने 138 गुण मिळवत उत्तम यश प्राप्त केले. दोघांनीही आपल्या मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पालक, शिक्षक व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यानिमित्ताने संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. निकत सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच विद्यार्थ्यांच्या यशासाठी परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचेही मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट सातत्याने प्रयत्नशील असून आगामी काळातही असेच उज्वल यश मिळवत राहू, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…
* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…