मुस्लिम विकास परिषदेचे वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मुस्लिम बालकांच्या खतना कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते यावेळी या शिबिरात 108 मुलांची खतना ( मुंज ) खतना स्पेशालिस्ट डॉ उजेर बेग यांनी शस्त्रक्रिया करून केली आहे
आज सकाळी सात वाजता नालबंद मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी मौलाना सय्यद अली मुजावर यांनी प्रार्थना करुन शिबीराची सुरवात करण्यात आली या वेळी मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष फारुक जमादार, जहांगीर बेग,न्यु इरा इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष अजीम मोगल,कै,ना,म, जगताप शाळेचे व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मजहर शेख, बकशभई शेख,जमीर शेख, मोहसीन नालबंद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला
यावेळी या शिबिरास माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, युवा नेते अमीरशेठ तांबोळी, जेष्ठ पत्रकार नासीरभाई कबीर, पत्रकार अशपाक सय्यद रा,काॅं चे आझाद शेख आदींनी जणांनी भेटी दिल्या
यावेळी मौलाना मुजावर म्हणाले की, इस्लाम धर्मात खतनाला विशेष महत्त्व आहे अशा शिबीरामुळे खर्चाची बचत होते कारण मुस्लिम समाजातील लहान लहान मुलांना खतना करण्यासाठी सोलापूर ला जावे लागते समाजातील गरीब लोकांना खर्च परवडत नाही परंतु गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम विकास परिषद दरवर्षी शिबिर आयोजित करत आहे त्यामुळे अनेक लहान बालकांना याचा लाभ मिळत आहे असे ते यावेळी म्हणाले
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी अरबाज बेग, असीम बेग, समीर शेख शाहरुख शेख, शाहीद बेग, जावेद शेख,अकील सय्यद,आलीम खान सोहेल शेख आदीं जणांनी परिश्रम घेतले शेवटी फारुक जमादार यांनी आभार मानले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…