बैठकीदरम्यान नवउद्योजकांना उद्योगधंदे सुरू करण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळामार्फत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती देण्यात आली. समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारावा, असे आवाहन तालुकाध्यक्ष संतोष दादा कुलकर्णी यांनी केले.
याशिवाय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजनाही उपलब्ध असून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील होतकरू युवक-युवतींना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, हा महामंडळाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या भेटीदरम्यान भारत घुगीकर काका साडे, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. बैठकीत समाजाच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
दरम्यान, ज्या नवीन उद्योजकांना कर्ज घ्यायचे आहे त्यांच्यासाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज व माहितीपत्रके अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. इच्छुकांनी कार्यालयाशी संपर्क साधून योजनांची सविस्तर माहिती घ्यावी, असे आवाहन संस्थेमार्फत करमाळा तालुका अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…