माढा तालुक्यातील चिंचगाव येथील “श्री महादेव मंदिर” या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत विविध विकास कामांसाठी राज्य शासनाने तब्बल २ कोटी ४९ लाख ९९ हजार ४०३ रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून ही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे . यामुळे यात्रास्थळाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
मा. प्रधान सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखाली ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या राज्य निकष समितीच्या बैठकीत संबंधित प्रस्तावावर चर्चा करण्यात आली होती. विकास कामांची अंदाजपत्रके व आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून समितीने निधीस मान्यता देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार शासनाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय निधीतून या कामांना मंजुरी दिली आहे.
मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये एनएच-१४५ ते सत्संग आश्रम महादेव टेकडी चिंचगाव रोडपर्यंत रस्ता सुधारणा करण्यासाठी ९९ लाख ९९ हजार ४२७ रुपये, सत्संग आश्रम परिसरात काँक्रिट व डांबरीकरणासाठी ९९ लाख ९९ हजार ९७६ रुपये तसेच संरक्षण भिंत बांधण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या विकासकामांमुळे यात्रेकरूंना सुविधा उपलब्ध होणार असून परिसराचे सुशोभीकरण आणि सुरक्षिततेतही वाढ होणार आहे. या विकास कामासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी पाठपुरावा केला होता .स्थानिक नागरिकांकडून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
करमाळा प्रतिनिधी निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…