Categories: करमाळा

करमाळा बाजार समिती उर्वरित अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणाची कामे स्वनिधीतूनच करणार माजी आमदार जयवंतराव जगताप यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीने मुख्य बाजार आवार करमाळा येथील प्रमुख रस्त्यांची कॉंक्रिटीकरणाची कामे पूर्ण केलेली असून सदरची कामे कोणत्याही वित्तीय संस्था अथवा बँकेचे कर्ज न घेता स्वनिधीतूनच केलेली आहेत व उर्वरित अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणाची कामे देखील आम्ही लवकरच हाती घेत असून ती देखील स्वनिधीतूनच करणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिली .याविषयी अधिक माहिती देताना जगताप यांनी सांगितले की,देशभक्त कै. नामदेवराव जगताप यांनी करमाळा तालुका व परिसरातील शेतकऱ्यांना त्यांनी कष्टाने पिकवलेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी स्वतःची हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने १९४८ साली बाजार समितीची स्थापना केली .तद्नंतर त्यांनी करमाळा व जेऊर येथे जागा खरेदी व संपादीत केल्या व बाजार समितीत पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या .त्याचा सदृश्य परिणाम म्हणजे शेतकरी ,व्यापारी ,हमाल- तोलार व अन्य घटकांच्या प्रापंचिक उन्नती व आर्थिक सुधारणेत झाला .आर्थिक उलाढालीमुळे करमाळा शहर व बाजारपेठ सर्वांगाने फुलू लागली . जस जसा बाजार समितीचा कामकाजाचा डोलारा वाढू लागला तस तसा बाजार समितीला उत्पन्न वाढीच्या अन्य स्तोत्राची गरज भासू लागली .मी १९८९ साली बाजार समितीची सूत्रे हाती घेतल्यानंतर सोयी सुविधा व त्यासाठी उत्पन्न वाढीची गरज लक्षात घेऊन बाजार समितीचे नगररोड व जामखेड रोड वॉल कंपाऊंड लगत शॉपिंग सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला .इथून पुढे बाजार समितीचे उत्पन्नात वाढ झाली व शेकडो सुशिक्षित तरुण बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली .शॉपिंग सेंटर बरोबरच सेल हॉल ,गोदामे, रयत भवन, कार्यालयीन इमारत, शेतकरी निवास,धान्य चाळणी यंत्र ,भाजी मंडई व कॅटल मार्केटची उभारणी केली .शेतकऱ्यांना आर्थिक व्यवहारांच्या सुलभतेसाठी डीसीसी बँकेची शाखा मार्केट यार्ड येथे काढली .रस्ते ,वीज, पाणी या पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या .करमाळा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसमक्ष उघड लिलाव, विक्री केलेल्या शेतमालाचे २४ तासाच्या आत पट्टी तसेच पदाधिकारी, शेतकरी व्यापारी, हमाल -तोलार आदी घटकांमध्ये असलेला अंतर्गत समन्वय यामुळे शेतकरी व खरेदीदारांचा करमाळा मार्केट वर प्रचंड विश्वास आहे .त्यामुळेच करमाळा तालुक्यासह आसपासच्या जिल्ह्यातील शेतमाल मोठ्या प्रमाणावर करमाळा येथे विक्रीस येतो व करमाळा बाजारपेठेचा विश्वसनीय बाजारपेठ असा नावलौकिक आहे .करमाळा बाजार समिती सातत्याने वाढाव्यात राहणारी बाजार समिती असून कर्ज न काढता स्वनिधीतूनच विकास कामे करण्यावरच आमचे कटाक्षाने लक्ष असते . गतवर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाजार समितीच्या उत्पन्नात घट झाली तरी देखील पारदर्शी व काटकसरी कामकाजामुळे बाजार समिती वाढाव्यात आहे .आगामी काळात आम्ही उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रित केले असून त्यातून शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबविण्याचा व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचाआमचा मानस असल्याची माहिती देखील यावेळी माजी आमदार जगताप यांनी दिली *.महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचा संचालक या नात्याने संघाच्या संचालक मंडळाच्या शिष्टमंडळासह पणनमंत्री ना .जयकुमार रावल यांची भेट घेऊन भावांतर भुगतान योजना लागू करण्याची मागणी करणार असल्याचे जगताप यांनी सांगीतले* : ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात शेतमाल विक्री केला आहे परंतु हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल विक्री झाला असेल तर शासनाने मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर भावांतर भुगतान योजना लागू करावी .मध्यप्रदेश सरकारने हमीभाव दर व मार्केटमधील दरातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करून दिलासा दिला होता .

saptahikpawanputra

Recent Posts

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

8 hours ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

1 day ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

2 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

2 days ago

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त करमाळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

2 days ago

शासकीय कामकाजाचे प्रत्यक्ष धडे! ‘नामसाधना’च्या चिमुकल्यांनी स्वतः अर्ज लिहून मांडल्या समस्या; मुख्याधिकाऱ्यांकडून कौतुक

करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…

3 days ago