Categories: Uncategorized

दत्तकला शिक्षण संस्थेत POSH कायद्याविषयी जनजागृती कार्यक्रम महिला सुरक्षितता, सन्मान आणि हक्कांविषयी विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन

करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेत POSH कायद्याविषयी जनजागृती  महिला सुरक्षितता आणि कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये “कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण कायदा २०१३ (POSH Act)” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ॲडव्होकेट स्नेहा विजय भापकर आणि ॲडव्होकेट कल्पना श्रीकांत साळुंके यांनी विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांना पॉश कायद्याची सविस्तर माहिती दिली.
यावेळी त्यांनी महिलांचे कायदेशीर हक्क, कार्यस्थळी सुरक्षिततेचे महत्त्व, लैंगिक छळाच्या घटनांविरोधात उपलब्ध संरक्षण तसेच तक्रार निवारण प्रक्रियेविषयी सखोल मार्गदर्शन केले. महिलांनी अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवून आपल्या अधिकारांविषयी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात बोलताना ॲडव्होकेट स्नेहा भापकर यांनी “कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण कायदा २०१३” अंतर्गत प्रत्येक संस्थेमध्ये अंतर्गत तक्रार समिती (ICC) असणे बंधनकारक असल्याचे सांगितले. महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि सकारात्मक वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून, यासाठी संस्थांनी संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच दत्तकला शिक्षण संस्थेच्या ICC अंतर्गत तक्रार समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
संस्थेमध्ये सध्या सुमारे ३२०० विद्यार्थिनी शिक्षण घेत असून २७२ महिला कर्मचारी कार्यरत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संस्था सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती कॅम्पस मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर यांनी दिली. महिला सुरक्षिततेला संस्था नेहमीच प्राधान्य देत असून विद्यार्थिनींसाठी सुरक्षित व सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास संस्थेतील सर्व प्राचार्य, शिक्षक, महिला कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच कायद्याविषयी जनजागृती निर्माण करण्यात आली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

8 hours ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

14 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 day ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago