Categories: Uncategorized

आरक्षण हे जातीवर नसून तत्कालीन व्यवसायावर आहे.मराठ्यांचा व्यवसाय शेती म्हणजे कुणबीच असल्यामुळे आरक्षण मिळाले पाहिजे- औदुंबरराजे भोसले

करमाळा प्रतिनिधी आरक्षण हे जातीवर नसून तत्कालीन व्यवसायावर आहे.मराठ्यांचा व्यवसाय शेती म्हणजे कुणबीच असल्यामुळे आरक्षण मिळाले पाहिजे असे मत.श्रीमंत- औदुंबरराजे भोसले यांनी केले आहे.आजच्या जातीची ओळख हे व्यवसायावरून आहे.गावगाड्यांमध्ये जीवन जगत असताना सर्व जीवनावश्यक वस्तू सोयी सुविधा उपलब्ध होऊन जीवन सुखी होण्यासाठी आणि त्याचा मोबदला आपल्याच माणसांना मिळावा या उद्देशाने मराठा समाजामध्ये कामाचे नियोजनबद्ध वाटप झाले.चर्म,चमडे,चांभ यांचे काम करणारा चर्मकार म्हणजेच चांभार,लोखंड म्हणजे लोहाचे काम करणारा लोहार,फुलाची माळ विनणारा माळी,गावाची राखण करणारा राखणदार म्हणजे सिक्युरिटी त्यांना महाराखणदार ही पदवी दिली आहे.त्याचा अपभ्रमश होऊन महार,विणकाम करणारा कोष्टी, कपडे शिवणारा शिंपी,मातीचा कुंभ बनणारा कुंभार,धनाचे आगर असणाऱ्या शेळ्यामेंढ्या सांभाळणारा धनगर.राजेमल्हारराव होळकर हे धनगर व्यावसायिक परंतु यांची इतिहासात व आजही इंदोरमध्ये ओळख मराठा सरदार अशी आहे.सोन्याचे काम करणारा सुवर्णकार म्हणजे सोनार, कोलांट्या उड्याचा खेळ करणारे कोल्हाटी,धान्यापासून तेल बनविणारा तेली,लाकडाला सुता सारखा सरळ करणारा सुतार, साळी,कैकाडी,डवरी,रामोशी, मातंग,गोसावी,कोळी अशा आठरा पगड बारा बलुते मध्ये विभागले गेले.कोण काय काम करतो यावरून त्यांची ओळख निर्माण झाली.त्याचे रूपांतर जातीमध्ये केले गेले.परंतु ही जात नसून हा व्यवसाय आहे.उदाहरणार्थ जात- मराठा ,व्यवसाय लोहारकी.जात- मराठा,व्यवसाय माळी.जात- मराठा व्यवसाय कुणबी. आपली सर्वांची जात मराठा आहे. शेतीचा समानार्थी शब्द कुणबी परंतु ओळख मराठा म्हणून आहे.आणि इतर व्यवसायिकांची ओळख त्यांच्या व्यवसायानुसार निर्माण झाली व जाणून-बुजून करण्यात आली.आजही आपण गावगाड्यांमध्ये सर्वजण एकत्रच आहोत.आणि पुढेही एकत्रच राहणार,आपण सर्वजण .एकाच रक्त मांसाचे मराठा क्षत्रिय लढवय्ये आहोत.असे संत तुकाराम महाराजांनी देखील अभंगाद्वारे सूचित केले आहे. *तुका म्हणे एका देहाचे अवयव सुखदुःख जीव भोगपावे* ही भावना पुन्हा सर्वांच्या मध्ये निर्माण झाली पाहिजे आरक्षण हे याच व्यवसायावरून दिले .कास्ट या शब्दाचा अर्थ जात नसून व्यवसायच आहे.आज पर्यंत देशाचे राष्ट्राचे संरक्षण करणारा शेतकरी,कुणबी अडचणीत आहे.आत्महत्या करत आहे.आत्महत्या थांबविण्यासाठी मदत म्हणून आरक्षण आवश्यक आहे.आणि मराठा म्हणजेच कुणबी आणि शेतकरी एकच आहेत.असे असंख्य पुरावे असताना देखील आरक्षण नाकारले जात आहे.धनगर व धनगड हे दोन्ही शब्द एकच आहेत.हे विषय साधे सोपे असताना 75 वर्ष सरकारला दुरुस्ती करता येत नाही.ही मोठी शोकांतिका आहे.संघर्ष योद्धा मा.मनोजदादा जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे.धनगर व मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे आवाहन नेरलेचे मा.सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक श्रीमंत.औदुंबरराजे भोसले यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

18 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago