Categories: करमाळा

वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचा पदवीदान सोहळा उत्साहात; २४३ विद्यार्थ्यांना पदव्या, मान्यवरांचा गौरव

नाशिक, प्रतिनिधी : वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन, भूषणम् पुरस्कार सोहळा आणि पदवीदान समारंभ शनिवारी (३१ मे) गंगापूर रोड येथील शंकराचार्य संकुलात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात विविध विषयांवरील मार्गदर्शनपर व्याख्याने, गुणवंतांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
समारंभात डॉ. नरेंद्र सहस्त्रबुद्धे यांना ‘वास्तुभूषण’ तर श्री. दीपक वाघ यांना ‘ज्योतिष भूषण’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन ज्योतिषाचार्य लक्ष्मीकांत जोशी यांच्या हस्ते झाले.
अधिवेशनात ज्योतिष व संबंधित शास्त्रांवरील विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. कुलभूषण मंगळे यांनी विवाहयोग, डॉ. नरेंद्र सहस्त्रबुद्धे यांनी वास्तुशास्त्र, अजय दीक्षित यांनी शकून विचार, सौ. पद्मश्री पेटकर यांनी रत्नशास्त्र, तर ज्योतिषाचार्य हर्षद महाजन यांनी नोकरी व व्यवसाय या विषयांवर सखोल विवेचन केले.
वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचा उच्चस्तरीय ‘ज्योतिष भूषण’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या ६६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच ज्योतिष प्रबोध, ज्योतिष विशारद, ज्योतिष प्रवीण आणि कृष्णमूर्ती विशारद हे विविध अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या १७७ विद्यार्थ्यांनाही पदव्या देऊन गौरविण्यात आले. अशा प्रकारे एकूण २४३ विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास राज्यातील विविध भागांतून आलेले सुमारे ३०० हून अधिक विद्यार्थी, ज्योतिष अभ्यासक आणि ज्योतिषप्रेमी उपस्थित होते. उपस्थितांनी व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष व ग्रंथकर्ते ग्रंथभूषणम् श्री. भूषण महाजन, ज्योतिषाचार्य हर्षद प्रतिभा रमेश महाजन, कोषाध्यक्ष श्री. किरण क्षत्रिय, सौ. भार्गवी भूषण महाजन, भूषण पाटील, श्री. प्रशांत पैठणे, सौ. नूतन रहाळकर, सारिका ठोंबरे, कैवल्य दीक्षित आणि तेजस क्षेमकल्याणी यांनी विशेष परिश्रम घेतले.
समारंभाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी संस्थेचे अभिनंदन केले. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

24 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago