छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर आयोजित करण्यात येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी करमाळा शहरातील ५० शिवभक्तांचा जत्था ४ जून रोजी रात्री ८ वाजता भवानी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकातून रायगडकडे रवाना होणार आहे. यंदा या रायगडवारीचे सलग पाचवे वर्ष असून शिवप्रेमी व इतिहासप्रेमींमध्ये या उपक्रमाबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे.
रायगडवारीचे आयोजन स्थानिक शिवभक्तांच्या वतीने करण्यात आले असून, करमाळ्यातील विविध भागांतील ५० शिवभक्त एका टेम्पोमधून प्रवास करणार आहेत. भवानी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला अभिवादन करून महाराजांच्या जयघोषात या यात्रेला प्रारंभ होणार आहे.
६ जून रोजी रायगडावर पार पडणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा संकल्प शिवभक्तांनी व्यक्त केला आहे. या यात्रेदरम्यान शिवचरित्राचे स्मरण, राष्ट्रभक्तीची प्रेरणा आणि शिवविचारांचा प्रसार करण्याचा संदेशही देण्यात येणार आहे.
रायगडवारीसाठी आवश्यक नियोजन पूर्ण झाले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसह भोजन व इतर सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे तरुणांमध्ये इतिहासाविषयी जागृती निर्माण होण्यास मदत होणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, संपूर्ण वारीदरम्यान आचारी मंडळाकडून भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असून भजन, कीर्तन, शिवगर्जना आणि शिवचरित्राचे गायन करत ही रायगडवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या रायगड किल्ल्यावरील राज्याभिषेक सोहळ्याचा ऐतिहासिक अनुभव घेण्यासाठी करमाळ्यातील शिवभक्त मोठ्या उत्साहाने सज्ज झाले आहेत. या रायगडवारीमुळे शिवप्रेमींच्या भावनांना नवी ऊर्जा मिळणार असल्याचे चित्र आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…